15 चित्रपटांच्या निर्मात्याची मुंबईतील गणपती मंदिरात आत्महत्या

मुंबई : चित्रपट निर्माते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सदानंद उर्फ पप्पू लाड यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ग्रॅंट रोड परिसरातील गणपती मंदिरात बुधवारी सकाळी त्यांचा मृतदेह सापडला. हे मंदिर पप्पू लाड यांनीच बाधलं आहे. पप्पू लाड यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पप्पू लाड यांनी 15 हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली …

15 चित्रपटांच्या निर्मात्याची मुंबईतील गणपती मंदिरात आत्महत्या

मुंबई : चित्रपट निर्माते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सदानंद उर्फ पप्पू लाड यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ग्रॅंट रोड परिसरातील गणपती मंदिरात बुधवारी सकाळी त्यांचा मृतदेह सापडला. हे मंदिर पप्पू लाड यांनीच बाधलं आहे. पप्पू लाड यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

पप्पू लाड यांनी 15 हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली आहे. पप्पू लाड यांनी मराठी आणि काही भोजपुरी चित्रपटांची निर्मिती केली. त्यांनी निर्मिती केलेल्या चित्रपटांपैकी देहांत, श्श्श… तो आलाय, कुंभारवाडा डोंगरी, माझ्या नवऱ्याची गर्लफ्रेण्ड या चित्रपटांची चर्चाही झाली. मात्र, सगळेच चित्रपट विशेष काही गाजले नाही.

पप्पू लाड यांनी निर्मिती केलेला ‘देहांत’ हा चित्रपट विशेष गाजला. या चित्रपटाचं लेखन प्रदीप म्हापसेकर यांनी केले होते, तर प्रसिद्ध अभिनेते अशोक शिंदे यांनी या चित्रपटात काम केले होते.

प्रत्येक चित्रपटाचा पहिला सीन ग्रँड रोड येथील त्यांनी बांधलेल्या लाडाच्या गणपती मंदिरातीलच असावा, असा पप्पू लाड यांचा आग्रह असायचा. बूट पॉलिश ते चित्रपट निर्माता असा त्यांचा प्रवास होता.

सदानंद लाड यांनी निर्मिती केलेल चित्रपट :

 • देहांत
 • कुंभारवाडा डोंगरी
 • श्श्श… तो आलाय
 • लाडाची चिंगी
 • माझ्या नवऱ्याची गर्लफ्रेण्ड
 • एक कटिंग चाय बाय 2
 • धुर्पी
 • स्वामी
 • झिंगाट
 • इस्कट
 • मोहब्बत की जंग
 • दगाबाज पंडित
 • जब जब खून पुकारे
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *