मुंबईत आग लागून, इमारतींचे भाग कोसळून मृत्यूचे प्रमाण वाढलं, वर्षभरात तब्बल 13 हजार दुर्घटना

गेल्या वर्षभरात मुंबईत तब्बल 13 हजार 150 दुर्घटनांची नोंद पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडे झाली (Mumbai accident cases increase) आहे.

मुंबईत आग लागून, इमारतींचे भाग कोसळून मृत्यूचे प्रमाण वाढलं, वर्षभरात तब्बल 13 हजार दुर्घटना
Follow us
| Updated on: Feb 23, 2020 | 8:09 AM

मुंबई : जागतिक दर्जाचं शहर अशी ओळख असलेल्या मुंबईत दररोज दुर्घटना घडत (Mumbai accident cases increase)  असतात. मुंबईत दुर्घटनांचे सत्र कमी होताना दिसत नाही. गेल्या वर्षभरात मुंबईत तब्बल 13 हजार 150 दुर्घटनांची नोंद पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडे झाली आहे. यात 179 जणांचा मृत्यू झाला असून 722 जण जखमी झाले आहेत. यात आग, इमारतींचे भाग, घरे, भिंती कोसळून मृत्यू झाल्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

मुंबईत आग लागण्याचे प्रमाण वाढते आहे. पावसाळ्यात झाडे पडणे, घर, घरांच्या भिंती, इमारतींचे भाग कोसळणे, गॅस गळती होऊन सिलेंडर स्फोट, तसेच नाले, मॅनहोल, नदी, समुद्र- खाडी, विहीर, खदानी, पूल, मॅलहोलमध्ये पडून रस्त्यावर अपघात यासारख्या अनेक दुर्घटना घडल्या आहेत.

गेल्या 1 जानेवारी 2019 पासून डिसेंबर 2019 पर्यंत एकूण 13 हजार 150 दुर्घटना घडल्या. यात 179 जणांचा मृत्यू झाला. यात 132 पुरुष आणि 47 स्त्रियांचा समावेश आहे. तर 722 जण जखमी झाले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांनी माहिती अधिकारातून ही माहिती (Mumbai accident cases increase) दिली.

तर दुसरीकडे गेल्या वर्षभरात मुंबईत आग आणि शॅार्टसर्किटच्या 5 हजार 254 घटनांची नोंद झाली आहे. यात 38 जणांचा मृत्यू झाला. तर 216 जण जखमी झाले.

त्याशिवाय घर, घरांचे भाग, भिंती, इमारती, इमारतींचे भाग कोसळण्याच्या 1 हजार 003 घटना घडल्या. त्यात 57 जणांना आपले प्राण गमवावे लागले. तर 299 जण जखमी झाले.

झाडे, झाडांच्या फांद्या पडण्याच्या 4 हजार 938 दुर्घटनांची नोंद झाली आहे. यात 8 जणांचा मृत्यू झाला असून 42 जण जखमी झाले आहेत. समुद्रात, नाल्यात, नदीत, विहिरीत, खाडीत, मॅनहोलमध्ये पडण्याच्या 128 दुर्घटना घडल्या. यात 62 जणांचा मृत्यू झाला तर 30 जण जखमी (Mumbai accident cases increase) झाले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.