मुंबईतील नायर रुग्णालयातून पाच दिवसांचं बाळ चोरीला

शितल साळवी असं मातेचं नाव असून सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. एवढ्या मोठ्या रुग्णालयातून बाळ चोरीला गेल्याने एकच खळबळ माजली आहे. शिवाय रुग्णांची चिंता देखील वाढली आहे.

मुंबईतील नायर रुग्णालयातून पाच दिवसांचं बाळ चोरीला

मुंबई : रुग्णालयातून पाच दिवसांचं नवजात बाळ चोरीला गेल्याची घटना मुंबईत घडली आहे. मुंबईतील नायर रुग्णालयायतील वॉर्ड क्रमांक सातमधील ही घटना आहे. शितल साळवी असं मातेचं नाव असून सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. एवढ्या मोठ्या रुग्णालयातून बाळ चोरीला गेल्याने एकच खळबळ माजली आहे. शिवाय रुग्णांची चिंता देखील वाढली आहे.

बाळ पळवणाऱ्या महिलेची ओळख पटल्याचंही बोललं जातंय. कारण संबंधित महिला सकाळपासूनच हॉस्पिटलमध्येच वावरत होती. तिने बाळ पळवलं ते CCTV फुटेजमध्ये चित्रित झालं असल्याची माहिती आहे. पण महिलेला त्याचा अंदाज आला आणि ती सटकली. त्या वॉर्डची जबाबदारी असलेल्या सुरक्षा रक्षकांवर कारवाई करण्याची कार्यवाही सध्या सुरू असल्याची माहिती मिळतेय.

बाळ चोरीला गेल्याची कल्पना येताच एकच खळबळ उडाली. यानंतर आग्रीपाडा पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. आग्रीपाडा पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *