कुठल्याही स्थितीत राज ठाकरेंना आघाडीत येऊ देणार नाही : संजय निरुपम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कुठल्याही परिस्थिती काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत घेणार नाही, येऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि उत्तर पश्चिम मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी जाहीर केली आहे. ‘टीव्ही ९ मराठी’शी काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी विशेष बातचीत केली. काय म्हणाले संजय निरुपम? “राज ठाकरे यांना कुठल्याही परिस्थितीत आघाडीत घेणार […]

कुठल्याही स्थितीत राज ठाकरेंना आघाडीत येऊ देणार नाही : संजय निरुपम
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कुठल्याही परिस्थिती काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत घेणार नाही, येऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि उत्तर पश्चिम मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी जाहीर केली आहे. ‘टीव्ही ९ मराठी’शी काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी विशेष बातचीत केली.

काय म्हणाले संजय निरुपम?

“राज ठाकरे यांना कुठल्याही परिस्थितीत आघाडीत घेणार नाही, येऊ देणार नाही. मनसेचा आघाडीला फायदा होताना दिसला नाही. मनसेसाठी राष्ट्रवादी आग्रही असली, तरी काँग्रेसचा त्याला सक्त विरोध राहील. मनसेची भूमिका आणि काँग्रेसची भूमिका पूर्णपणे विरोधी असून, मनसेच्या भूमिकेचं कुठल्याही परिस्थितीत समर्थन करता येणार नाही.” असे काँग्रेस नेते संजय निरुपम म्हणाले.

मुंबई काँग्रेसच्या वादावर काय म्हणाले संजय निरुपम?

“मुंबई काँग्रेसमध्ये आता वाद होणार नाही, अशी अपेक्षा आहे. कारण आधी ते आरोप करायचे माझ्यावर. आता त्यांनी कोणावर आरोप करण्याची वेळ येऊ देऊ नये. त्याची काळजी सध्याच्या नेतृत्वानं घेण्याची गरज आहे.” असे म्हणत संजय निरुपम यांनी काँग्रेसचे दक्षिण मुंबईचे लोकसभेचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्यावर निशाणा साधला.

तसेच, “राहुल गांधी, प्रियंका गांधी यांचा मुंबईत रोड शो झाला नाही हे दुर्दैवी आहे. त्यांचा रोड शो का झाला नाही, याबद्दल मुंबई काँग्रेसचे पदाधिकारीच उत्तर देऊ शकतील. आतापर्यंत लोकसभा निवडणुकीत कायम काँग्रेसच्या अध्यक्षांचा रोड शो झाला आहे.” असे म्हणत संजय निरुपम यांनी मुंबई काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्यासह काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला.

मोदींवर संजय निरुपम यांचं टीकास्त्र

“नरेंद्र मोदी, अमित शहा यांचा विजय झाला तर तो ईव्हीएमचा विजय असेल. ईव्हीएमबद्दल मोठ्या प्रमाणात शंका आहे. त्यावर आयोगानं उत्तर दिलं पाहिजे. प्रचाराची पातळी मोदी यांनीच खाली केली. अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन मोदी बोलतात. मोदींना उत्तर द्यायला म्हणून विरोधकांना टीका करावी लागते. खोटं बोलण्यात मोदी पटाईत आहेत. ज्यावेळी डिजिटल कँमेऱ्याचा शोध नव्हता लागला तेव्हा मोदींनी कसा फोटो काढला?” असे म्हणत संजय निरुपम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

“पश्चिम बंगालमध्ये अमित शहा गेल्यावरच कसा हिंसाचार होतो? लोकशाही दृष्टीनं मोदी आणि शहा यांना हटवलं गेलं पाहिजे. मोदींच्या हुकूमशाही वृत्तीला कोणीही समर्थन देऊ शकत नाही.” असेही संजय निरुपम म्हणाले.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.