पुढच्या वर्षी बाप्पा 11 दिवस लवकर येणार

पुढच्या वर्षी लवकर या म्हणणाऱ्या प्रत्येक गणेशभक्ताची (Next year Ganpati Date) हाक गणपती बाप्पाने ऐकली आहे.

पुढच्या वर्षी बाप्पा 11 दिवस लवकर येणार

मुंबई : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या (Anant Chaturdashi 2019) अशा भक्तीपूर्ण वातावरणात आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला जात आहे. गणपती बाप्पाला निरोप देताना सर्वच गणेशभक्तांचे (Ganpati Visarjan) डोळे पाणावले आहे. पुढच्या वर्षी लवकर या म्हणणाऱ्या प्रत्येक गणेशभक्ताची (Next year Ganpati Date) हाक गणपती बाप्पाने ऐकली आहे. कारण खरोखरचं, 2020 मध्ये गणपती बाप्पा 11 दिवस लवकर येणार आहेत.

पुढच्या वर्षी गणपती बाप्पा 22 ऑगस्ट 2020 मध्ये विराजमान होणार आहेत अशी माहिती अनेक पंचांगकर्त्यांनी दिली आहे. पंचांगकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या वर्षी 22 ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे. तर 1 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे.

त्याशिवाय बुधवारी 31 ऑगस्ट 2022, मंगळवार 19 सप्टेंबर 2023, शनिवार 7 सप्टेंबर 2024, बुधवार 27 ऑगस्ट 2025 या पुढील 5 वर्षांच्या बाप्पाच्या आगमनाच्या तारखा आहे.

दरम्यान सध्या मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यात ठिकठिकाणी सर्वत्र गणेश विसर्जनाचा (Anant Chaturdashi 2019) उत्साह दिसत आहे. अनंतचतुर्दशीनिमित्त (Anant Chaturdashi 2019) लाडक्या गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी भक्तांचा जनसागर राज्यभरातील विविध समुद्र किनारे, नद्या-तलाव तसंच कृत्रिम तलावांजवळ उसळला आहे. गेले अकरा दिवस भक्तिभावे पूजा करताना गणेशभक्तांमध्ये उत्साह असला, तरी साश्रू नयनांनी बाप्पाला निरोप (Anant Chaturdashi 2019) दिला जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *