लग्नसराईच्या दिवसात सोन्याचे भाव गगनाला, 50 हजारांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता

लग्नसराईच्या दिवसात मागणी वाढल्याने सोन्याच्या भावात मोठी उसळी दिसून येत (Gold rate today) आहे.

gold rate increase, लग्नसराईच्या दिवसात सोन्याचे भाव गगनाला, 50 हजारांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता

मुंबई : लग्नसराईच्या दिवसात मागणी वाढल्याने सोन्याच्या भावात मोठी उसळी दिसून येत (Gold rate today) आहे. झवेरी बाजारात सोन्याचा भाव 462 रुपयांनी वाढला. चांदीच्या दरात प्रति किलो 1047 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदीचा भाव 47 हजार 605 रुपये इतका झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या 95 वर्षात 10 ग्रॅम सोन्याची किंमत तिप्पटीने वाढली आहे. आज मुंबईत सोन्याचा भाव 43 हजार 520 रुपये इतका आहे.

चीनमधील ‘करोना व्हायरस’चे पडसाद जागतिक कमॉडिटी बाजारावर उमटत आहेत. बुधवारी कमॉडिटी बाजारात सोने दर प्रति औंस 1606 डॉलरपर्यंत वाढला. गेल्या काही वर्षांतील सोन्याचा जागतिक बाजारातील हा सर्वोच्च दर आहे. दरम्यान येत्या काही दिवसात सोन्याचा भाव 50 हजारांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता (Gold rate today) आहे.

यापूर्वी फेब्रुवारी 2013 मध्ये जागतिक बाजारात सोने 1617 डॉलर प्रति औसपर्यंत वधारले होते. चांदीच्या दरात वाढ झाली असून चांदीचा भाव प्रति औंस 18.32 डॉलरवर गेला.

करोना व्हायरस’मुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान होत असून जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये भितीचे वातावरण पसरलं आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक कमी करुन सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेकजण सोने खरेदीकडे आकर्षित होत आहेत. बुधवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोने दरात 0.11 टक्क्यांची घट झाली. MCX मध्ये सोने दर प्रति दहा ग्रॅम 41 हजार 375 रुपये होता. चांदीचा भाव मात्र 1078 रुपयांनी वधारला. त्यामुळे चांदीचा भाव 47 हजार 340 रुपये झाला आहे.

चीनमध्ये पसरलेल्या ‘कोरोना व्हायरस’मुळे सोन्याची आयात निर्यात बंद आहे. त्यामुळे याचा फटका सोन्याचा व्यापार आणि ग्राहकांवर पडत आहे. विशेष म्हणजे येत्या काही दिवसात सोन्याचा भाव 50 हजारांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता (Gold rate today) आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *