मुंबई रेल्वे योजनांसाठी केंद्राकडून 33 हजार कोटी मंजूर

नवी दिल्ली: निवडणुकांच्या तोंडावर केंद्र सरकाने मुंबई आणि महाराष्ट्रासाठी भरघोस निधी मंजूर केला आहे. केंद्र सरकारने मुंबईतील परिवहन योजनांसाठी तब्बल 33 हजार 690 कोटी रुपये मंजूर केले आहेत. याद्वारे मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प फेज तीन ‘ए’ला (MUTP 3A ) मंजुरी मिळाली. रेल्वे मार्गांचा विस्तार आणि रेल्वेच्या अत्याधुनिकीकरणासाठी रेल्वे मंत्रालयाने 54 हजार 777 कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला […]

मुंबई रेल्वे योजनांसाठी केंद्राकडून 33 हजार कोटी मंजूर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

नवी दिल्ली: निवडणुकांच्या तोंडावर केंद्र सरकाने मुंबई आणि महाराष्ट्रासाठी भरघोस निधी मंजूर केला आहे. केंद्र सरकारने मुंबईतील परिवहन योजनांसाठी तब्बल 33 हजार 690 कोटी रुपये मंजूर केले आहेत. याद्वारे मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प फेज तीन ‘ए’ला (MUTP 3A ) मंजुरी मिळाली.

रेल्वे मार्गांचा विस्तार आणि रेल्वेच्या अत्याधुनिकीकरणासाठी रेल्वे मंत्रालयाने 54 हजार 777 कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला होता. त्यापैकी 33 हजार 690 कोटी रुपये मंजूर झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या अर्थ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबतची माहिती दिली. एसी लोकल रेल्वे, रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता, उपनगरीय लोकल वाहतूक यासारख्या विविध सेवांवर हा निधी खर्च करण्यात येणार आहे.

मुंबईकरांना काय फायदा? MUTP 3A मध्ये मुंबईसह उपनगरासांठी मोठे प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. यामध्ये –

– सीएसएमटी – पनवेल या हार्बर मार्गावर एलिवेटेड कॉरिडोर बनवणे

-पनवेल ते विरार उपनगर कॉरिडोर

-हार्बर लाईन गोरेगावपासून बोरिवलीपर्यंत वाढवणे

– बोरिवली – विरार दरम्यान पाचवी आणि सहावी लाईन टाकणे

– कल्याण – आसनगाव दरम्यान चौथी लाईन सुरु करणे

– कल्याण – बदलापूर दरम्यान तिसरी आणि चौथी लाईन

– विविध रेल्वे स्थानकांचा विस्तार, अत्याधुनिकरण, तांत्रिक सक्षमीकरण करणे

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.