आता ठाण्यातही टाटा कॅन्सर हॉस्पिटल, एकनाथ शिंदेंकडून प्रयत्न सुरु

मुंबई : आरोग्यमंत्रिपदाची धुरा हाती घेतल्यानंतर पहिल्याच बैठकीत एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात कॅन्सरवरील उपचारासाठी हॉस्पिटल उभारण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे केंद्र ठाण्यात उभारावे, यासाठी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पावलं टाकली आहेत. शिवाय, सर्वच जिल्हा रुग्णालयात मोफत केमोथेरपी सुविधा सुरु करावी, असे आवाहनही एकनाथ शिंदेंनी केले आहे. तसेच, आरोग्य विभागातील रिक्त पदे विहित कालमर्यादेत […]

आता ठाण्यातही टाटा कॅन्सर हॉस्पिटल, एकनाथ शिंदेंकडून प्रयत्न सुरु
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

मुंबई : आरोग्यमंत्रिपदाची धुरा हाती घेतल्यानंतर पहिल्याच बैठकीत एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात कॅन्सरवरील उपचारासाठी हॉस्पिटल उभारण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे केंद्र ठाण्यात उभारावे, यासाठी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पावलं टाकली आहेत. शिवाय, सर्वच जिल्हा रुग्णालयात मोफत केमोथेरपी सुविधा सुरु करावी, असे आवाहनही एकनाथ शिंदेंनी केले आहे. तसेच, आरोग्य विभागातील रिक्त पदे विहित कालमर्यादेत भरण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरु आहे, असेही त्यांनी सांगितले. आरोग्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बैठक घेऊन विभागाच्या कामाचा आढावा घेतला.

ठाण्यात टाटा कॅन्सर हॉस्पिटलचं केंद्र

कर्करोगाचे वाढते प्रमाण चिंताजनक असून केमोथेरपी उपचाराची सुविधा जिल्हा रुग्णालयात मिळावी यासाठी सर्वच जिल्हा रुग्णालयात याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. मुंबईतील टाटा कर्करोग रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर रुग्णांची गर्दी होते, ती कमी करण्यासाठी ठाणे येथे टाटा कर्करोग रुग्णालयाचे केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. यासाठी महापालिका जागा देण्यासही तयार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

आरोग्य विभागातील रिक्त पदं तातडीने भरणार

आरोग्य विभागातील रिक्त पदांबाबत आरोग्यमंत्री म्हणाले, सामान्य नागरिकांना चांगली सेवा देण्यासाठी विभागातील रिक्त पदे तातडीने भरावीत. विविध संवर्गातील 15 हजार पदे रिक्त आहेत ती विहित कालमर्यादेत भरण्यात यावी. ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांना चांगल्या सेवा सुविधा दिल्या पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्री यांनी सांगितले की, ग्रामीण भागात असणारी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र ही सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयांवरचा ताण कमी होण्यास मदत होईल. राज्यात मेगा भरती होणार असून त्यामाध्यमातून आरोग्य विभागाचे सुमारे दहा हजार रिक्त पदे भरण्यात येतील.

  • राज्यातील माता व बालमृत्यू रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती घेतल्यानंतर आरोग्यमंत्री म्हणाले, या क्षेत्रात राज्याचे काम चांगले असून हा मृत्यूदर अजून कमी करण्यासाठी अजून प्रयत्न केले जावेत.

  • आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करून सामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी विभागाने प्रयत्न करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले.

  • राज्य कामगार वीमा योजना सोसायटी अध्यक्ष पद मुख्य सचिवांकडे राहणार असून केंद्र शासनाकडून मिळालेला 1600 कोटी रुपयांचा निधी कामगार वीमा रुग्णालयांच्या सक्षमीकरणासाठी वापरला जाणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सीटीस्कॅन आणि डायलिसीससाठी जिल्हानिहाय स्वतंत्र यंत्रणा

राज्यात शासकीय आरोग्य संस्थामध्ये सीटीस्कॅन आणि डायलिसीससाठी मोठ्या प्रमाणावर रुग्णांना प्रतिक्षा करावी लागते. ही समस्या लक्षात घेता प्रत्येक जिल्हानिहाय सीटीस्कॅन आणि डायलिसीससाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात येणार असून त्यामुळे सामान्य रुग्णांना त्याचा लाभ होईल. ठाणे येथे महापालिकेने बांधलेल्या इमारतीमध्ये सुमारे 100 डायलीसीस यंत्रांच्या मदतीने डायलीसीस सेंटर सुरु केले जाणार आहे. दुर्गम भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांना वेतनाव्यतिरिक्त सानुग्रह अनुदान देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.