उद्धव ठाकरेंच्या कौतुकाचे मुंबईत होर्डिंग, विरोधकांकडून कोरोना रुग्णसंख्येत महाराष्ट्र चीनच्या पुढे गेल्याची आठवण

भाजपने कोरोना नियंत्रणात अपयशी ठरल्याचा आरोप करत राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे (Hoarding Banner of CM Uddhav Thackeray in Mumbai ).

उद्धव ठाकरेंच्या कौतुकाचे मुंबईत होर्डिंग, विरोधकांकडून कोरोना रुग्णसंख्येत महाराष्ट्र चीनच्या पुढे गेल्याची आठवण
Follow us
| Updated on: Jun 10, 2020 | 3:45 PM

मुंबई : एकट्या महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येने चीनलाही मागे टाकले आहे. त्यातच मुंबई-पुण्यासह राज्यातील इतर अनेक ठिकाणी वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या आरोग्य यंत्रणेसमोर नवी आव्हानं उभी करत आहेत. यावरुन विरोधी पक्ष भाजपने देखील राज्य सरकार कोरोना नियंत्रणात अपयशी ठरल्याचा आरोप करत चांगलेच धारेवर धरले आहे (Hoarding Banner of CM Uddhav Thackeray in Mumbai ). असं असताना मुंबईत मात्र ठिकठिकाणी कोरोना परिस्थिती हाताळणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर कौतुकाचा वर्षाव करणारे होर्डिंग लागल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे याची जोरदार चर्चा सुरु आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची परिस्थिती यशस्वीपणे हाताळल्याचं सांगत मुंबईत अनेक ठिकाणी त्यांचं कौतुक करण्यात आलं आहे. शहरातील ही होर्डिंग बरिच कल्पक असल्याचंही दिसत आहे. विशेष म्हणजे या होर्डिंगवर केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो आहे. हे होर्डिंग हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषेत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जावी, असाही या होर्डिंगचा हेतू असल्याची चर्चा आहे.

मुंबईत ठिकठिकाणी लावलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हे होर्डिंग एका खासगी जाहिरात एजन्सीकडून लावण्यात आले आहेत. एकीकडे महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येने चीनलाही मागे टाकले आहे. दुसरीकडे खासगी जाहिरात एजन्सीच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा उंचावण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यावरुन विरोधीपक्षाने सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका कोरोना रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप भाजपने केला आहे.

दरम्यान, देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आधी भारतातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येने चीनमधील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीला पिछाडीवर सोडलं होतं. आता एकट्या महाराष्ट्र राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा चीनमधील रुग्णसंख्येपेक्षा अधिक झाल्याने चिंता वाढली आहे. (Maharashtra COVID Patients surpasses China Total Corona Positive Patients)

सध्या महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 90 हजाराहून अधिक झाला आहे. यापैकी 44 हजार 849 रुग्ण अद्यापही कोरोना अॅक्टीवर आहेत. आतापर्यंत राज्यातील 42 हजार 638 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. दुसरीकडे चीनमध्ये आतापर्यंत एकूण 83,040 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकट्या महाराष्ट्र राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा संपूर्ण चीन देशातील कोरोना रुग्णांपेक्षा जास्त झाला आहे.

संबंधित बातम्या :

चिंताजनक! आधी भारताने, आता महाराष्ट्रानेही कोरोना रुग्णसंख्येत चीनला टाकलं पिछाडीवर

Hoarding Banner of CM Uddhav Thackeray in Mumbai

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.