26 जुलै 2005 रोजी मुंबईत किती पाऊस झाला होता?

पंपिंग स्टेशन आणि प्रशासनाकडून मदतकार्य केलं जात असलं तरी पाऊस आल्यानंतर पाणी आणखी वाढून अडचणी वाढत आहेत. चिंतेची बाब म्हणजे हवामान विभागाने आणखी चार दिवस पावसाचा इशारा दिलाय.

26 जुलै 2005 रोजी मुंबईत किती पाऊस झाला होता?
Follow us
| Updated on: Jul 02, 2019 | 2:58 PM

मुंबई : कधीही न थांबणाऱ्या मुंबईचे रस्ते ठप्प झाले आहेत, लाईफलाईन असणारी लोकल रेल्वे बंद पडली आहे आणि रस्त्यांवर पाणी अजूनही साचलेलं आहे. पंपिंग स्टेशन आणि प्रशासनाकडून मदतकार्य केलं जात असलं तरी पाऊस आल्यानंतर पाणी आणखी वाढून अडचणी वाढत आहेत. चिंतेची बाब म्हणजे हवामान विभागाने आणखी चार दिवस पावसाचा इशारा दिलाय. मुंबईतील ही परिस्थिती भयावह वाटत असली तरी यापूर्वीही असाच अनुभव मुंबईकरांनी घेतला होता. त्या तुलनेत हा पाऊस कमी असल्याचं हवामान विभागाने सांगितलं.

हवामान खात्याच्या उपमहासंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 25 वर्षातील हा सर्वाधिक पाऊस आहे. 5 जुलै 1974 रोजी 375 मिलीमीटर पाऊस पडला होता.त्यानंतर आज 375 मिली पाऊस पडलाय. इतिहासातला सर्वात धोकादायक पाऊस मुंबईने 26 जुलै 2005 रोजी अनुभवला होता. त्यावेळी 944 मिली पाऊस झाला होता, ज्याने हजारो जीव घेतले होते.

26 जुलै 2005 रोजी काय झालं होतं?

मुंबईने सर्वात मोठी जीवितहानी करणारा पाऊस 26 जुलै 2005 रोजी अनुभवला होता. यामध्ये एक हजारपेक्षा जास्त लोकांचा जीव गेला होता, तर 14 हजार घरं उद्ध्वस्त झाली होती. 24 तासात तब्बल 944 मिली पाऊस पडला होता, जो गेल्या तेव्हा 100 वर्षातला सर्वाधिक पाऊस होता. 37 हजार रिक्षा, 4000 टॅक्सी आणि 900 बेस्ट बसेसचं नुकसान झालं होतं, तर हजारो मोठी वाहनं पाण्यात अडकली होती. ज्यामुळे 5.5 बिलियनचं नुकसान झालं होतं.

कुर्ला, धारावी या परिसरात तर अक्षरशः हाहाःकार माजला होता. लोकल रेल्वे ठप्प झाली होती, तसेच अनेक ट्रेनचं नुकसान झालं होतं. आज सोशल मीडिया असल्यामुळे ट्वीट केलं तरीही बीएमसी आणि रेल्वेकडून मदत पाठवली जाते, पण तेव्हा फेसबुक आ ट्विटरचा वापर नव्हता. शेकडो लोकांचा मदतीअभावी जीव गेला होता. पाण्यात अडकलेल्या लोकांना 24 तासांपेक्षा जास्त काळ घरी जाता आलं नव्हतं.

मुंबईकरांचं स्पीरिट नेहमीच पाहिलं जातं. दोन वर्षांपूर्वी 28 ऑगस्ट रोजी पाऊस झाला होता तेव्हाही हा अनुभव आला होता. मुंबईकरांनी एकमेकांना मदत करत माणुसकीचं दर्शन घडवलं होतं.

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.