बारावीच्या निकालाची तारीख ठरली

पुणे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल उद्या म्हणजेच 28 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजल्यापासून बारावीच्या विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बारावीचा निकाल कधी लागणार याची विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली होती. दरम्यान, बोर्डाने विद्यार्थ्यांची उत्सुकता जास्त ताणून न धरता सोमवारी 26 […]

बारावीच्या निकालाची तारीख ठरली
Follow us
| Updated on: May 27, 2019 | 5:45 PM

पुणे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल उद्या म्हणजेच 28 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजल्यापासून बारावीच्या विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बारावीचा निकाल कधी लागणार याची विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली होती. दरम्यान, बोर्डाने विद्यार्थ्यांची उत्सुकता जास्त ताणून न धरता सोमवारी 26 मे रोजी निकालाची तारीख जाहीर केली आहे.

बारावी परीक्षेला राज्याच्या 9 विभागांतून जवळपास 17 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील 3 लाख 83 हजार विद्यार्थी हे मुंबई विभागातील आहे. राज्यातील 2 हजार 957 केंद्रांवर बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच 29 मेपासून विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार आहे.

‘या’ वेबसाईटवर निकाल पाहता येणार 

  1. www.mahresult.nic.in
  2. www.hscresult.mkcl.org
  3. www.maharashtraeducation.com
  4. www.maharashtra12.jagranjosh.com

निकाल कसा पाहाल ?

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.

त्यानंतर तुम्हाला HSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.

त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.

त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर M123456 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव सोनाली असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात  M123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच SON असे लिहावे लागेल.

यानंतर लगेचच तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर पाहाता येईल

निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

एसएमएसवर निकाल

बीएसएनएल मोबाइलधारकांना एसएमएसवर निकाल पाहता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना MHHSC <space> <seat no> असा एसएमएस टाईप करुन 57766  वर पाठवावा लागणार आहे. त्यानंतर अवघ्या काही सेकंदात विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल एसएमएस सेवेद्वारे पाठवला जाईल.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.