घर खाली करा, BMC ची मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय IAS प्रवीण दराडेंना नोटीस

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय IAS अधिकारी आणि विद्यमान सचिव प्रवीण दराडे आणि त्यांच्या पत्नी पल्लवी दराडे यांना मुंबई महापालिकेचा बंगला सोडावा लागणार आहे. जल विभागाचा बंगला खाली करण्याची नोटीस मुंबई पालिकेने बजावली आहे. प्रवीण दराडे आणि पल्लवी दराडे हे दाम्पत्य राज्य सरकारच्या नोकरीवर असताना सुद्धा पालिकेच्या मलबार हिल बंगल्यात राहत आहेत. मलबार हिल येथील …

घर खाली करा, BMC ची मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय IAS प्रवीण दराडेंना नोटीस

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय IAS अधिकारी आणि विद्यमान सचिव प्रवीण दराडे आणि त्यांच्या पत्नी पल्लवी दराडे यांना मुंबई महापालिकेचा बंगला सोडावा लागणार आहे. जल विभागाचा बंगला खाली करण्याची नोटीस मुंबई पालिकेने बजावली आहे. प्रवीण दराडे आणि पल्लवी दराडे हे दाम्पत्य राज्य सरकारच्या नोकरीवर असताना सुद्धा पालिकेच्या मलबार हिल बंगल्यात राहत आहेत.

मलबार हिल येथील हा पालिकेचा जल विभागाचा बंगला असून, या भागात भूमिगत जलाशय आहे. याची दुरुस्ती पालिकेकडून करण्यात येणार आहे. यामुळे हा बंगला दराडे दाम्पत्याला सोडावा लागणार आहे.

गेल्या वर्षी महापौरांसाठी मलबार हिल येथील बंगल्याची मागणी झाल्यावर, महापालिकेने या आधी सुद्धा हा बंगला खाली करा, असं दराडे दाम्पत्याला कळवलं होतं. पण त्यावेळी नगरविकास खात्याने हस्तक्षेप करुन, हा बंगला पालिकेने खाली करु नये अशी सूचना केली होती. पण आता मात्र हे घर दराडे दाम्पत्याना सोडावं लागणार आहे.

कोण आहेत प्रवीण दराडे? 

IAS प्रवीण दराडे हे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आहेत.

सध्या प्रवीण दराडे एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त आहेत.

त्यांची पत्नी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त आहेत.

प्रवीण दराडे हे 1998 च्या बॅचचे आयएएस आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *