सावधान! रेल्वे रुळ ओलांडाल तर 'यमराज' उचलून नेईल

गेल्या अनेक काळापासून रेल्वे रुळ ओलांडतांना अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडत आहेत. रेल्वेकडून वारंवार सूचना करुनही लोक निष्काळीपणा दाखवतात आणि रेल्वे रुळ ओलांडताना अपघाताला बळी पडतात.

सावधान! रेल्वे रुळ ओलांडाल तर 'यमराज' उचलून नेईल

मुंबई : लोकल ही मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाते (Mumbai Local). मात्र, रेल्वेच्या नियमांचं पालन न केल्याने हीच लाईफलाईन जीवघेणीही ठरु शकते (Railway Accident). गेल्या अनेक काळापासून रेल्वे रुळ ओलांडतांना अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडत आहेत. रेल्वेकडून वारंवार सूचना करुनही लोक निष्काळीपणा दाखवतात आणि रेल्वे रुळ ओलांडताना अपघाताला बळी पडतात. मात्र, आता या अपघातांना थांबवण्यासाठी रेल्वेने एक निराळी शक्कल लढवली आहे. यानंतर ‘जो कुणी रेल्वे रुळ ओलांडेल त्याला यमराज उचलून नेईल’, असा उपक्रम रेल्वे राबवत आहे (Railway Yamraj). हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. मात्र, रेल्वे पोलिसांनी रेल्वे अपघात रोखण्यासाठी हा नवीन उपक्रम राबवला आहे (Railway Yamraj).

मुंबईच्या पश्चिम रेल्वे आणि आरपीएफ ‘मिशन यमराज’ हा उपक्रम राबवत आहे. याअंतर्गत रेल्वे स्थानकावर यमराजच्या वेशभुषेत काही लोकांना तैनात करण्यात आलं आहे. हे लोक रेल्वे रुळांवर चालणाऱ्या लोकांवर नजर ठेवतील. या उपक्रमाअंतर्गत जी व्यक्ती रेल्वे रुळांवरुन चालताना दिसेल, त्याला हे यमराज उचलून घेऊन जातील आणि चांगलाच धडा शिकवतील.

रेल्वे मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या उपक्रमाचे काही फोटो शेअर करण्यात आले. यामध्ये काही लोक यमराजच्या वेशभुषेत दिसत आहेत. हे लोक रेल्वे रुळांवर चालणाऱ्या लोकांना उचलून नेत असतानाही दिसत आहे.

“अनधिकृतपणे रेल्वे रुळ ओलांडू नये, हे जीवघेणं ठरु शकतं. जर तुम्ही अनधिकृतपणे रेल्वे रुळ ओलांडाल, तर तुमच्या समोर यमराज उभे राहतील”, असं कॅप्शन या फोटोंना देण्यात आलं आहे.

मुंबईत पश्चिम रेल्वे आणि आरपीएफ ‘यमराज’च्या भूमिकेच्या माध्यमातून लोकांमध्ये याविषयी जागरुकता पसरवण्याचं काम करत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *