LIVE : भास्कर जाधवांकडून पक्षांतर करण्याचा निर्धार

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

LIVE : भास्कर जाधवांकडून पक्षांतर करण्याचा निर्धार
Picture

भास्कर जाधवांकडून पक्षांतर करण्याचा निर्धार

राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांचा शिवसेना प्रवेश जवळपास निश्चित, जे सोबत येतील त्यांना नेऊ, जाधव यांचं सूतोवाच, भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, मात्र पक्षांतर करणार असल्याची कबुली

30/08/2019,3:35PM
Picture

इचलकरंजीत राष्ट्रवादीला खिंडार, नगरपालिकेतील गटनेत्यासह ५ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

इचलकरंजीमध्ये राष्ट्रवादीला खिंडार, नगरपालिकेतील गटनेत्यासह ५ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारीही शिवसेनेत प्रवेश करणार

30/08/2019,12:20PM
Picture

महिलांवरील अत्याचाराविरोधात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने

पुणे : महिला आणि बालकांवरील अत्याचाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने, पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुक निदर्शने, काळया फिती लावून महिलांचं मूक आंदोलन, जवाब दो जवाब दो भाजपा सरकार जवाब दो असे फलकही महिलांनी झळकावले

30/08/2019,12:09PM
Picture

नेरुळ येथील पोद्दार शाळेत दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा शाळेतच दुर्दैवी मृत्यू

नवी मुंबई : नेरुळ येथील पोद्दार शाळेत दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा शाळेतच दुर्दैवी मृत्यू, सकाळी 8 वाजताची घटना, सौम्या भटनागर असे या विद्यार्थिनीचे नाव, सौम्या शाळेत अचानक कोसळून पडली, तिला फिट आल्याचे समजून शाळेतील शिक्षकांनी तिला उचलून वर्गात नेले, त्यानंतर डी.वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.

30/08/2019,11:56AM
Picture

सोलापूर पुणे महामार्गावर शिवशाही बसचा अपघात

सोलापूर : सोलापूर पुणे महामार्गावर शिवशाही बसचा अपघात, शिवशाही बस जोरात झाडाला धडकली, एका प्रवासाचा मृत्यू, तर 15 जण जखमी, मल्लिकार्जुन अंबुसे असे मृत प्रवासाचे नाव, पुणे सोलापुर महामार्गावरील शेठफळ गावाजवळची घटना

30/08/2019,11:53AM
Picture

ठाण्यात 7 वर्षीय मुलीवर अत्याचार

ठाण्यातील चितळ सर मानपाडा पोलिस हद्दीत 7 वर्षीय मुलीवर अत्याचार, 42 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, चितळसर मानपाडा पोलिसात गुन्हा दाखल, पीडित मुलीवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु, आरोपी पोलिसांच्या ताब्यात, पोलिसांची पोस्को अंतर्गत कारवाई, अधिक तपास सुरु

30/08/2019,11:51AM
Picture

चाळीसगावातील राहीपुरीत अपघात, 10 प्रवासी जखमी

चाळीसगाव : चाळीसगाव राहीपुरीत अपघात, ट्रकने मागून धडक दिल्याने बस नाल्यात पडली, राष्ट्रीय महामार्ग क्र 211 वरील भोरस फाट्यावर अपघात, अपघातात एकूण 10 प्रवासी जखमी, जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु

30/08/2019,11:45AM
Picture

जालना बलात्कार प्रकरण : पीडित तरुणीचा मृतदेह ताब्यात घ्यायला नातेवाईकांचा नकार

बलात्कार पीडित तरुणीचा मृतदेह ताब्यात घ्यायला नातेवाईकांचा नकार, 36 तास उलटले तरी मृतदेह ताब्यात घेतला नाही, आरोपीला पकडल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा कुटुंबाचा पवित्रा, 28 जुलैला रात्री बलात्कार झाला होता.

30/08/2019,11:43AM
Picture

जालना बलात्कारप्रकरणाची महिला आयोगाकडून दखल

मुंबईमध्ये सामूहिक अत्याचाराला बळी पडलेल्या मूळच्या जालना येथील तरूणीच्या मृत्यूप्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आतापर्यंतच्या तपासाचा अहवाल द्या आणि आरोपींना तातडीने अटक करा, अशा सूचना आयोगाने मुंबई पोलिसांना दिल्या आहेत.

30/08/2019,11:41AM
Picture

छत्तीसगड : कलम 370 रद्दच्या विरोधात माओवाद्यांची आज भारत बंदची हाक

छत्तीसगड : कलम 370 रद्दच्या विरोधात माओवाद्यांची आज भारत बंदची हाक, भारत बंदचं आव्हान करणारी अनेक बॅनर आणि पत्रके कांकेर जिल्हयात लावण्यात आली, 370 रद्द च्या विरोधात माओवादी संघटना दुसर-यांदा बॅनर बाजी, भाजप आणि तेलंगणा राष्ट्रीय समिती या दोन पक्षांना टार्गेट करण्याचा माओवाद्यांचा इशारा,

30/08/2019,10:12AM
Picture

कराड : कोयना पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस

कराड : कोयना पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस, धरणाच्या पायथा वीजगृहातून 2100 क्युसेक पाणी नदीपात्रात सोडणार, गेल्या 15 दिवसांपासून कोयन धरणातून होणारा पाणी विसर्ग बंद होता, सध्या धरणात 102.97 टीएमसी पाणीसाठा

30/08/2019,10:05AM
Picture

कोल्हापूर : 'कडकनाथ' घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल

कोल्हापूर : ‘कडकनाथ’ घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल, कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात 3 कोटी 94 लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल, सुधीर मोहिते आणि संदीप मोहिते यांच्यावर गुन्हे दाखल, विजय आमते यांची तक्रार

30/08/2019,10:02AM
Picture

इचलकरंजी : केंद्रीय पूर पथक कोल्हापूरमध्ये दाखल, पूरग्रस्त भागातील पाहणी करणार

इचलकरंजी : केंद्रीय पूर पथक कोल्हापूरमध्ये दाखल, पूरग्रस्त भागातील पाहणी करणार, शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, नरसिंहवाडी, घालवाड, कुटवाड यांसह इतर पूरग्रस्त गावातील पाहणी करणार, इचलकरंजी शहरातील पूरग्रस्त भागातील शेळके मळा, जुना चंदुर रोड, तसेच यंत्रमाग कारखान्यांनाही पूर पथक भेट देणार, महापुरामुळे यंत्रमाग कारखान्यांचे कोट्यावधींचे नुकसान, याची केंद्रीय पथक करणार पाहणी

30/08/2019,9:59AM
Picture

लातूर- शिळी खीर खाल्ल्याने 13 जणांना विषबाधा

लातूर- शिळी खीर खाल्ल्याने 13 जणांना विषबाधा, चाकूर तालुक्यातल्या शंकरवाडी येथील घटना, प्राथमिक उपचारानंतर सर्वांची प्रकृती स्थिर

30/08/2019,9:54AM
Picture

पुण्यातील बेकर्स कंपनीला भीषण आग

पुणे : बेकर्स कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी

30/08/2019,9:53AM
Picture

आमदार राणा जगजीतसिंह वडील पद्मसिंह पाटलांसह भाजपच्या वाटेवर

उस्मानाबादचे विद्यमान आमदार राणा जगजीतसिंह पाटील आणि माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील भाजपचा झेंडा हाती घेण्याचे संकेत, ‘मला तुमच्याशी काही बोलायचंय’ अशा आशयाचे फलक लावून जगजीतसिंह पाटलांची राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याची तयारी

30/08/2019,9:50AM
Picture

पिण्याच्या पाण्यासोबतच अंघोळ आणि कपडे धुवायलाही फिल्टरचे पाणी, बबनराव लोणीकर यांची घोषणा

परभणी : नागरिकांना पिण्याच्या पाण्यासोबतच अंघोळीला आणि कपडे धुवायला सुद्धा फिल्टरच स्वच्छ पाणी देणार, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची माहिती

30/08/2019,9:48AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *