मुंबईवर मोठ्या दहशतवादी हल्ल्याचं सावट; ड्रोन उड्डाणांवर बंदी

मुंबईत ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायक्रो लाइट एअरक्राफ्ट, एरियल क्षेपणास्त्र किंवा पॅरा ग्लायडर्सवर बंदी घालण्यात आली आहे.

मुंबईवर मोठ्या दहशतवादी हल्ल्याचं सावट; ड्रोन उड्डाणांवर बंदी

मुंबईः राज्याची राजधानी असलेल्या मुंबईवर मोठ्या दहशतवादी हल्ला होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. येत्या 30 दिवसांत मुंबईवर ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायक्रो लाइट एअरक्राफ्ट, एरियल क्षेपणास्त्र किंवा पॅरा ग्लायडर्सद्वारे हल्ला होऊ शकतो, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. त्यामुळेच मुंबईत ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायक्रो लाइट एअरक्राफ्ट, एरियल क्षेपणास्त्र किंवा पॅरा ग्लायडर्सवर बंदी घालण्यात आली आहे. (feared terror attack in mumbai)

कलम 144 अंतर्गत मुंबई पोलिसांनी हा आदेश जारी केला आहे. मुंबईच्या सुरक्षेला बाधा पोहोचू नये, म्हणून 30 ऑक्टोबर 2020 पासून 28 नोव्हेंबर 2020 किंवा पुढील आदेश निघेपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे. दहशतवाद्यांकडून व्हीव्हीआयपी ठिकाणांना लक्ष्य केले जाऊ शकते. अशा परिस्थितीत ड्रोन, लाईट एअरक्राफ्ट, पॅरा ग्लाइडिंगला 30 दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी 30 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबर या काळात सुरू राहील. पोलिसांनी संपूर्ण शहरात कलम 144 लागू करून जमावाला बंदी घातली आहे. गुप्तचर यंत्रणांकडून हाय अलर्ट मिळाल्यानंतर पोलीस सतर्क झाले आहेत.

सार्वजनिक मालमत्ता हे दहशतवाद्यांचे लक्ष्य असू शकते

सार्वजनिक मालमत्तादेखील दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असू शकते. इंटेलिजन्स विभागाच्या सूचनेनंतर परिसरात कोणत्याही उड्डाण करणा-या वस्तूवर बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पुढील 30 दिवस सुरू राहील, असे आदेशात म्हटले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर आयपीसी 1860च्या कलम 188 अन्वये दंडात्मक कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले. सामान्य लोकांनी घाबरू नये तर सावधगिरी बाळगावी. घाबरून जाण्याची गरज नाही, प्रत्येक जणानं सावध राहा, असे सांगत अपिल डीसीपी चैतन्य यांनी लोकांना केले आहे.

संबंधित महत्त्वाच्या बातम्या

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *