निवडणुकीच्या तोंडावर IPS देवेन भारतींची अचानक बदली, पोलिस दलात खळबळ

मुंबई : मुंबईचे कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त देवेन भारती यांची अचानक बदली करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने अचानक देवेन भारती यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत. निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी देवेन भरती यांची बदली लांबवण्यात आली होती. मात्र नुकतंच निवडणूक आयोगाने देवेन भारतींच्या बदलीचे आदेश दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या …

निवडणुकीच्या तोंडावर IPS देवेन भारतींची अचानक बदली, पोलिस दलात खळबळ

मुंबई : मुंबईचे कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त देवेन भारती यांची अचानक बदली करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने अचानक देवेन भारती यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत. निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी देवेन भरती यांची बदली लांबवण्यात आली होती. मात्र नुकतंच निवडणूक आयोगाने देवेन भारतींच्या बदलीचे आदेश दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. येत्या 11 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. मुंबईतील सहाही मतदारसंघात चौथ्या टप्प्यात म्हणजेच 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वीच निवडणूक आयोगाद्वारे मुंबईचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहआयुक्त देवेन भारती यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने वेगवेगळया राज्यातल्या काही आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा आदेश दिले आहेत. ज्यामध्ये मुंबईचे कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त देवेन भारती यांचे देखील नाव आहे. देवेन भारती यांच्या बदलीनंतर आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्त विनय चौबे हे कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त पद स्विकारणार आहेत. तर देवेन भारती यांची आर्थिक गुन्हे शाखेच्या सहआयुक्त पदी बदली करण्यात आली आहे.

दुसरीकडे, पश्चिम बंगालमधील कोलाकात्याचे पोलिस आयुक्तही बदलण्यात आले आहेत. आयपीएस अधिकारी डॉ. राजेश कुमार कोलकाताचे नवे पोलीस आयुक्त असतील, तर नटरंजन रमेश बाबू बिधाननगर चे नवे पोलीस आयुक्त असतील. निवडणूक आयोगाने ऐन निवडणुकीच्या काळातच अचानक बदल्यांचे आदेश दिल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *