समुद्र जीव वाचवण्यासाठी कोस्टल रोड कामात इस्रायल इको फ्रेंडली विटांचा वापर

पश्चिम उपनगरातील ट्रॅफिकवर मार्ग काढण्यासाठी पालिकेकडून कोस्टल रोड बांधला (israel bricks use for coastal road) जात आहे.

israel bricks use for coastal road, समुद्र जीव वाचवण्यासाठी कोस्टल रोड कामात इस्रायल इको फ्रेंडली विटांचा वापर

मुंबई : पश्चिम उपनगरातील ट्रॅफिकवर मार्ग काढण्यासाठी मुंबई महापालिकेकडून कोस्टल रोड बांधला (israel bricks use for coastal road) जात आहे. कोस्टल रोडमुळे समुद्र जीवांना धोका निर्माण होईल अशी भीती पर्यावरण प्रेमींनी न्यायालयाच्या निदर्शनास आणली होती. तसेच मच्छिमारांचा व्यवसाय बंद होईल अशी भीती मच्छिमारांनी व्यक्त केली होती. त्यावर उपाय म्हणून समुद्री जीवाला धोका निर्माण होऊ नये तसेच मच्छिमारांचा व्यवसायही सुरु राहावा म्हणून कोस्टल रोडच्या कामासाठी इको फ्रेंडली विटा वापरण्यात (israel bricks use for coastal road) येणार आहेत.

पश्चिम उपनगरातील ट्रॅफिकवर मार्ग काढण्यासाठी ‘शामलदास गांधी उड्डाणपूल’ (प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर) ते ‘राजीव गांधी सागरी सेतू’ (वांद्रे वरळी सी लिंक) वरळी आणि कांदिवलीपर्यंत कोस्टल रोड उभारला जात आहे. 16 हजार कोटींच्या या प्रकल्पाचे भूमिपूजन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. या प्रकल्पासाठी मुंबईतील अनेक ठिकाणच्या किनाऱ्यांवर भराव टाकण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पामुळे स्थानिक मच्छिमार, कोळीवाडे, ब्रीचकॅन्डी येथील रहिवासी आणि काही सामाजिक संस्थांनी विरोध करत उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

कोस्टल रोडसाठी समुद्रात भराव टाकल्याने समुद्री जीवाला धोका निर्माण होईल, या आशयाची याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. प्रकल्प राबवताना महापालिका प्रशासनाने पर्यावरण विषयक परवानग्या घेतल्या नसल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आले होते. या प्रकल्पासाठी 16 जुलै रोजी उच्च न्यायालयाने तर 19 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. नवे बांधकाम न करण्याच्या अटीवर न्यायालयाने 154 दिवसांनी स्थगिती उठवली आहे. पर्यावरण प्रेमी आणि कोळीबांधवाची नाराजी दूर करण्यासाठी आता इको ब्रिक्सचा वापर केला जाणार आहे.

“कोस्टल रोडमुळे समुद्री जीवाला धोका निर्माण होणार अशी भीती व्यक्त केली जात आहे. न्यायालयाने कोस्टल रोडच्या कामासाठी असलेली स्थगिती उठवल्यानंतर पालिकेने समुद्र जीव आणि कोळी बांधवांची गंभीर दखल घेतली आहे. सिमेंट काँक्रीटच्या बांधकामांमुळे मासे, खेकडे, कोळंबी आदी समुद्र जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून इस्रायल तंत्रज्ञानावर आधारित इको फ्रेंडली विटा वापरल्या जाणार आहेत. या विटांचा थर कोस्टल रोडच्या भिंती आणि पिलरच्या बाजूला लावण्यात येणार आहे. या विटांमुळे मासे, खेकडे, कोळंबी आदी समुद्र जीवांचे प्रजनन होणार आहे. यामुळे मच्छिमारांनाही आपला व्यवसाय करणे सोपे होणार आहे. तसेच कोळी बांधवाना आपल्या बोटी समुद्र किनारी आणता याव्यात यासाठी योग्य जागा ठेवली जाणार”, असं आयुक्त परदेशी यांनी सांगितले.

“राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणाबाबत अधिक जागरूकता आणि रक्षण करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम म्हणूनही पालिकेने पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने हे पाऊल टाकले आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो”, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *