11 वर्षीय मुलाच्या फुफ्फुसात घड्याळाचा सेल, जसलोकमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया

जसलोक हॉस्पीटलमधील डॉक्टरांनी 11 वर्षीय मुलाच्या फुफ्फसातून घड्याळाचा सेल काढला आहे. या 11 वर्षीय मुलाने चुकुन सेल गिळल्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता.

11 वर्षीय मुलाच्या फुफ्फुसात घड्याळाचा सेल, जसलोकमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया

मुंबई : जसलोक हॉस्पीटलमधील डॉक्टरांनी 11 वर्षीय मुलाच्या फुफ्फसातून घड्याळाचा सेल काढला. या 11 वर्षीय मुलाने चुकुन सेल गिळल्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे या 11 वर्षीय मुलाला कुटुंबियांनी रविवारी (30 जुलै) जसलोक हॉस्पीटलमध्ये दाखल केले. विशेष म्हणजे डॉक्टरांनी 24 तासाच्या आता या मुलावर यशस्वी शस्त्रक्रिया करत त्याला बरे करुन घरीही सोडले.

11 वर्षीय मुलाने कोरडा सेल गिळल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला तातडीने हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. सेल गिळल्यामुळे मुलाला खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने त्याच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली.

उपचारा दरम्यान डॉक्टरांनी एक्स-रेच्या माध्यमातून घड्याळाचा सेल शोधून काढला. सेल फुफ्फुसामध्ये असल्याचे निदर्शनास आले. यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करत हा सेल बाहेर काढला.

सेल मधील अॅसिड बाहेर येत होते आणि ते फुफ्फुसामध्ये पसरत होते. सेल अत्यंत धोकादायक असतात. कारण त्यामध्ये विविध विषारी पदार्थ असतात. ज्यामुळे अन्ननलिकेमध्ये जळजळ होऊ शकते आणि योग्य औषधोपचार न केल्यास ते घातक ठरु शकते, अस जसलोकच्या वरीष्ठ डॉक्टरांनी सांगितले.

“हा मुलगा केवळ 11 वर्षांचा असल्यामुळे हे एक आव्हान होते. तो श्वास घेत असताना देखील ब्राँकोस्कोपी स्वयंचलितपणे ऑपरेट करायची होती. मुलाला श्वास घेण्यास मदत करण्यासाठी ‘एंडोट्राचेल ट्यूब’ नावाच्या लवचिक प्लास्टिकच्या नळीला तोंडामध्ये बाजूला ठेवण्यात आले होते. सेल एंडोट्राचेल ट्यूबमधून बाहेर आला नसता कारण दूरच्या वातनलिकांमध्ये आणखी विचलित होण्याचा धोका पत्करण्याशिवाय त्याला पकडणे कठीण होते. जेथे ब्रोन्कोस्कोप पोहचणे शक्य न्हवते. अशा कठीण परिस्थितीत शस्त्रक्रिया करून सेल काढूणे हा एकमात्र पर्याय होता. त्यामुळे त्याचे फुफ्फुस शस्त्रक्रियेद्वारे उघडण्यात आले आणि सेल बाहेर काढण्यात आला, असं डॉ. हरीश चाफळे म्हणाले

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *