'यांना खाली बसवा, महाराष्ट्राने यांचं कौतुक केलंय', जयंत पाटलांचे राम कदमांना टोले

सुनिल काळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई: भाजप आमदार राम कदम यांनी मुली पळवण्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर उठलेली टीकेची झोड, अद्याप कायम आहे. त्यांना आता विधानसभेतही टोमणे ऐकायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी आज राम कदम यांना अक्षरश: मान खाली घालायला लावली. विधानसभेत आज अवनी वाघिणीच्या मुद्द्यावरुन लक्षवेधी सुरु होती. त्यावेळी …

'यांना खाली बसवा, महाराष्ट्राने यांचं कौतुक केलंय', जयंत पाटलांचे राम कदमांना टोले

सुनिल काळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई: भाजप आमदार राम कदम यांनी मुली पळवण्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर उठलेली टीकेची झोड, अद्याप कायम आहे. त्यांना आता विधानसभेतही टोमणे ऐकायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी आज राम कदम यांना अक्षरश: मान खाली घालायला लावली.

विधानसभेत आज अवनी वाघिणीच्या मुद्द्यावरुन लक्षवेधी सुरु होती. त्यावेळी जयंत पाटील प्रश्न विचारत होते, मात्र भाजप आमदार राम कदम हे मध्येच उठले. त्यामुळे जयंत पाटील म्हणाले, “यांना खाली बसवा, यांचं कौतुक उभ्या महाराष्ट्राने पाहिले आणि केले आहे. अवनीनं त्यांचा फोन नंबरच घ्यायला हवा होता”

वाघिणीचा खात्मा

तब्बल 13 जणांची शिकार करणाऱ्या नरभक्षक टी-1 वाघिणीचा खात्मा करणाऱ्यात र दीड महिन्यांनी यश आलं. शार्प शूटर अजगर अलीने शुक्रवारी 2 नोव्हेंबरच्या रात्री एकच्या सुमारास टी-1 वाघिणीला अचूक टिपत तिला गतप्राण केलं. टी-वाघिणीचा खात्मा होताच, गेल्या अनेक दिवसांपासून भयभीत अवस्थेत जगणाऱ्या यवतमाळच्या राळेगावातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडत एकच जल्लोष केला.

राम कदम यांचं वादग्रस्त वक्तव्य

भाजपचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मुलगी पसंत असेल आणि आई-वडिलांची परवानगी असेल, तर मुलीला पळवून आणून तुम्हाला देऊ असं राम कदम जाहीर म्हणाले होते. 4 सप्टेंबर 2018 रोजी राम कदम यांनी हे वक्तव्य केलं होतं.

“कोणत्याही कामासाठी भेटू शकता. साहेब, साहेब मी तिला प्रपोज केलं, ती मला नाही म्हणते, प्लिज मदत करा. शंभर टक्के मदत करणार. आधी मी सांगेन तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन या. जर आई-वडील म्हणाले की ही मुलगी मला पसंत आहे, तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार. त्या मुलीला पळवून आणण्यास मी मदत करेन. त्यासाठी माझा फोन नंबर घ्या आणि संपर्क साधा”, असं राम कदम म्हणाले.

संबंधित बातम्या 

मध्यरात्री शार्प शूटरचा नेम बसला, नरभक्षक वाघिणी ठार झाली! 

वाघिणीला ठार करणाऱ्या शार्प शूटरची धारदार प्रतिक्रिया 

अवनीच्या हत्येची चौकशी करु : मुख्यमंत्री    

‘सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय घेता, अवनीच्या पापाचंही घ्या’ 

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *