मुंबईत आज पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज (7 एप्रिल) मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील पायाभूत सुविधा, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळ आणि इतर कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे हाल होणार आहेत. विशेष म्हणजे पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. तसेच …

मुंबईत आज पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज (7 एप्रिल) मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील पायाभूत सुविधा, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळ आणि इतर कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे हाल होणार आहेत. विशेष म्हणजे पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. तसेच हार्बर मार्गावरही सकाळी 10 ते दुपारी 4 मधील सर्व लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. विविध कामांसाठी हा ब्लॉक सकाळी 11.10 ते दुपारी 3.40 पर्यंत घेण्यात आला आहे. ठाण्यावरुन सीएसएमटीकडे जाणाऱ्या धिम्या मार्गावरील सर्व लोकल सकाळी 10.37 ते दुपारी 3.31 पर्यंत जलद मार्गावर वळवल्या जातील. कल्याणवरुन सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद लोकल सकाळी 11.4 चे 3.06 दरम्यान दिवा, मुलुंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्थानकावर थांबतील. तर सीएसएमटीरुन कल्याणकडे जाणाऱ्या जलद लोकल सकाळी 10.16 ते 2.54 मध्ये घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलुंड आणि दिवा स्थानकावर थांबतील. ब्लॉक दरम्यान मध्य रेल्वेच्या सर्व लोकल 10 मिनिटे उशिरा धावतली.

पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. माहीम आणि गोरेगाव दरम्यान अप-डाऊन दोन्ही मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. सीएसएमटीकडून वांद्रे, गारेगाव आणि अंधेरीकडे जाणाऱ्या लोकल सकाळी 9.56 ते दुपरी 4.04 पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. तर वांद्रे, अंधेरी, गोरेगाववरुन सीएसएटीकडे जाणाऱ्या सर्व लोकल सकाळी 10.45 ते 4.29 पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

हार्बर मार्गावर

कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन धिम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी 10.34 ते दुपारी 3.08 पर्यंत हा ब्लॉक असणार आहे. सीएसएमटी ते पनवेल रेल्वेसेवा बंद राहणार आहे. ब्लॉक दरम्यान वाशी ते पनवेल आणि कुर्ला ते सीएसएमटी विशेष गाड्या चालवल्या जातील.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *