नवाब मलिकांच्या भावाची कामगारांना मारहाण, कप्तान मलिकांकडून हात पाय तोडण्याचीही धमकी

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे बंधू नगरसेवक कप्तान मलिक यांनी कामगारांना मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे (Kaptan Malik beat labours in Mumbai).

नवाब मलिकांच्या भावाची कामगारांना मारहाण, कप्तान मलिकांकडून हात पाय तोडण्याचीही धमकी

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे बंधू नगरसेवक कप्तान मलिक यांनी कामगारांना मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे (Kaptan Malik beat labours in Mumbai). हा व्हिडीओ जवळपास 1 महिन्यापूर्वीचा असल्याचं सांगितलं जात आहे. आपल्या प्रभागात वर्क ऑर्डरशिवाय काम सुरु असल्याचं लक्षात आल्यानंतर कप्तान मलिक यांनी कामगारांना मारहाण केली. तसेच कामगारांना हात पाय तोडण्याचीही धमकी दिली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे (Kaptan Malik beat labours in Mumbai).

कुर्ला येथे रस्त्याचे काम सुरु होते. त्या ठिकाणी 4 कामगार पाईपमध्ये वायर टाकायचे काम करत होते. त्याठिकाणी प्रभाग क्रमांक 70 चे नगरसेवक कप्तान मलिक यांनी कामगारांकडे कामाच्या ऑर्डरची विचारणा केली. मात्र, कामगारांनी कोणतीही ऑर्डर दाखवली नाही. त्यानंतर मलिक यांनी कामगारांना मारहाण केली.

यावर कप्तान मलिक म्हणाले, “तो खासगी ठेकेदार होता. तो महापालिकेचं नुकसान करत होता. त्याला एक दिवस आधीपण मी समजावलं होतं. त्यांना विनंती करुन काम थांबवण्यास सांगितलं. त्यादिवशी त्यांनी काम बंद केलं. मात्र, दुसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा काम केलं. मला पुन्हा ते काम करताना दिसले. ते दादागिरीने काम करत होते. ती दादागिरी थांबवण्यासाठी मला हे पाऊल उचलावं लागलं.”

महापालिकेकडे किती पैसे भरले हे पालिकेच्या अधिकाऱ्यांना जाऊन दाखवा. त्यानंतर त्यांची परवानगी घ्या आणि मग काम करा, असं मी कामगारांना सांगितले. मात्र, त्यांच्याकडे एकही परवानगी नव्हती. ते विनापरवानगी संबंधित काम करत होते, अशी माहिती कप्तान मलिक यांनी दिली.

मी मारहाण केली आहे. त्या व्हिडीओत देखील मी सांगितलं आहे की मी चुकीचं केलं तर माझ्यावर केस दाखल करा. मी जर चुकीचं केलं असतं तर त्या लोकांनी माझ्याविरोधात पोलीस तक्रार केली असती, असंही कप्तान मलिक म्हणाले.

व्हिडीओ पाहा:

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *