डॉ. पायलला आत्महत्येकडे घेऊन जाणारा शेवटचा एक तास

मुंबई : रॅगिंगला कंटाळून मुंबईतील नायर रुग्णालय वसतीगृहात जळगावच्या पायल तडवी या डॉक्टरने आत्महत्या केल्याने वैद्यकीय शिक्षण विभाग धास्तावला आहे. यावर सध्या कारवाई सुरु आहे. पण गेल्या दोन वर्षांपूर्वी पायल हा सर्व त्रास सहन करत होती. अखेर तिला हा त्रास सहन झाली नाही आणि तिने आत्महत्येचं पाऊल उचललं. मुलीच्या स्वप्नाखातर आयुष्य खर्ची घातलं मात्रं स्वप्न …

डॉ. पायलला आत्महत्येकडे घेऊन जाणारा शेवटचा एक तास

मुंबई : रॅगिंगला कंटाळून मुंबईतील नायर रुग्णालय वसतीगृहात जळगावच्या पायल तडवी या डॉक्टरने आत्महत्या केल्याने वैद्यकीय शिक्षण विभाग धास्तावला आहे. यावर सध्या कारवाई सुरु आहे. पण गेल्या दोन वर्षांपूर्वी पायल हा सर्व त्रास सहन करत होती. अखेर तिला हा त्रास सहन झाली नाही आणि तिने आत्महत्येचं पाऊल उचललं.

मुलीच्या स्वप्नाखातर आयुष्य खर्ची घातलं मात्रं स्वप्न पूर्ण होण्याआधीचं मुलीने आत्महत्या केल्याने माऊलीच्या अश्रूंच्या बांध फुटलाय. मात्र, त्या अश्रूंसोबत दु:ख आक्रोषही वाहत होता. त्यामागचं कारणही तसचं आहे. मुलगी पायलने रात्रीच्या डिनरनंतर हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. हॉस्टेलमधल्या तीन महिला सहकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून तिने टोकाचं पाऊल उचललं.

26 वर्षीय पायल ही मोठ्या उमेदीने जळगावहून मुंबईत आली होती. आदिवासी समाजातील होती. मुंबईच्या नायर रुग्णालयात डॉक्टरकीचं शिक्षण घेत होती. पायलला आरक्षित कोट्यामधून प्रवेश मिळाला होता. तिला आरक्षित कोट्यातून मिळालेल्या प्रवेशामुळेच हिणवलं गेलं आणि तिने या जगाचा निरोप घेतला.

आत्महत्येकडे घेऊन जाणारा शेवटचा एक तास

21 मे रोजी पायलच्या सहनशक्तीचा बांध फुटला. पायलला तिच्या जाण्याआधी एक तास व्हॉटसअपवर टोमणे मारले. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टोमणे मारण्यात आल्यामुळे सर्वांसमोर अपमान करण्यात आला. या जाचाला कंटाळून पायल खूप रडली. यावेळी पायलचा एक सेल्फी फोटो तिघींमधील एकीने पाहिला. या फोटोवरून तिला टोमणे मारायला सुरूवात केली. ती आदिवासी जातीतील असल्याचे टोमणे त्या तिघींनी तिला मारले. पायलला तिच्या खाण्यावरूनही अपमानित करण्यात आलं. पायलचे फोटो नायरच्या डीनला दाखविण्याची धमकी दिली. शिवाय ऑपरेशन थिएटरमध्ये तुला येऊ देणार नाही, असं म्हणूनही खच्चीकरण केलं. हे सर्व तिला सहन झालं नाही आणि नंतर एका तासातच तिने जगाचा निरोप घेतला.

एरवी एखाद्या कलावंताच्या साध्या ट्वीटवरून नोटीस बजावण्यासाठी तात्काळ पुढाकार घेणारा राज्यातील महिला आयोगसुद्धा पायलच्या प्रकरणात निद्रिस्त दिसला. अशी प्रकरणे घडल्यावर नुसती कारवाई करून वा मोर्चे काढून तो पुसला जाणे शक्य नाही. त्यासाठी समाजाच्या मानसिकतेत बदल घडवून आणणे गरजेचे आहे.

VIDEO : पायलच्या व्हॉट्सअप ग्रुपमधील चॅटिंग

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *