LIVE : राज्य मंत्रिमंडळाची उद्या बैठक

LIVE : राज्य मंत्रिमंडळाची उद्या बैठक
Picture

राज्य मंत्रिमंडळाची उद्या दुपारी 12.30 वाजता बैठक

राज्य मंत्रिमंडळाची उद्या दुपारी 12.30 वाजता बैठक, दुष्काळ आणि गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्यासंदर्भात बैठकीत चर्चा होणार, कॅबिनेट बैठक घेण्यास परवानगी मिळाली, निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता शिथील करण्याची परवानगी मिळाल्यास सर्व पालकमंत्री दुष्काळ दौरा करणार

01/05/2019,5:05PM
Picture

शरद पवार मुख्यमंत्र्यांवर कडाडले

01/05/2019,5:06PM
Picture

तेज बहादूर यादव यांचा अर्ज रद्द

समाजवादी पक्षाचे वाराणसीचे उमेदवार तेज बहादूर यादव यांचा अर्ज निवडणूक आयोगाकडून रद्द, सुप्रीम कोर्टात जाण्याची तेज बहादूर यांची तयारी, पंतप्रधान मोदींविरोधात लढण्याचा पवित्रा कायम

01/05/2019,3:58PM
Picture

महानायकाकडून महाराष्ट्र दिनाच्या मराठीतून शुभेच्छा

01/05/2019,9:54AM
Picture

सर्व मंत्री दुष्काळाची पाहणी करणार

नाशिक : राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती, ज्या ठिकाणी पाण्याच्या टँकरची गरज आहे, चारा छावण्यांची गरज आहे, त्या ठिकाणी येत्या आठवडाभरात व्यवस्था करणार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची माहिती, राज्यातील सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने राज्यातील दुष्काळ परिस्थितीचा पाहणी दौरा करणार

01/05/2019,9:46AM
Picture

अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करणार : सूत्र

संयुक्त राष्ट्र आज मसूद अजहरला ‘आंतरराष्ट्रीय दहशवादी’ घोषित करणार, सूत्रांची माहिती

01/05/2019,8:50AM
Picture

राष्ट्रपतींकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

01/05/2019,8:49AM
Picture

पुण्यात उद्या पाणीकपात

पुणे शहराचा उद्या दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार, जलकेंद्रांच्या देखभाल दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद, वडगाव, पर्वती आणि लष्कर या भागातील केंद्रांची दुरुस्ती, शुक्रवारी कमी दाबाने आणि उशिरा पाणीपुरवठा होणार, पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची माहिती

01/05/2019,8:49AM
Picture

पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

01/05/2019,8:48AM
Picture

वर्ध्यात तीव्र पाणी टंचाई

वर्धा जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई, कारखाने, एमआयडीसी आणि रेल्वेला पाणी कपात, जिल्ह्यात केवळ 10 टक्के पाणी शिल्लक राहल्याने निर्णय, कंपन्यांच्या पाण्यात 70 टक्के कपात, कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम होणार, पाण्याअभावी दोन महिने कंपनी बंद राहण्याची शक्यता

01/05/2019,8:47AM
Picture

शिवसेना खासदार राहुल शेवाळेंच्या पत्नीला एक वर्षाचा तुरुंगवास

2014 साली लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमधील वादाचे प्रकरण, मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली एक वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा, कामिनी शेवाळे शिवसेनेच्या माजी नगरसेविका आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळेंच्या पत्नी

01/05/2019,7:24AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *