LIVE : पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधी मोदी आईच्या आशिर्वादासाठी गुजरातमध्ये

, LIVE : पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधी मोदी आईच्या आशिर्वादासाठी गुजरातमध्ये
, LIVE : पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधी मोदी आईच्या आशिर्वादासाठी गुजरातमध्ये

लोकसभेतील विजयानंतर पंतप्रधान मोदींचे गुजरातमध्ये आगमन

लोकसभेतील विजयानंतर पंतप्रधान मोदींचे गुजरातमध्ये आगमन, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणींकडून स्वागत, आईची भेट घेत आशिर्वाद घेणार

26/05/2019,6:20PM
, LIVE : पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधी मोदी आईच्या आशिर्वादासाठी गुजरातमध्ये

30 मे रोजी मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी येत्या 30 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात पंतप्रधानपदाची शपथ घेणार, नव्या मंत्रिमंडळातील मंत्रीही शपथग्रहण करणार

26/05/2019,5:39PM
, LIVE : पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधी मोदी आईच्या आशिर्वादासाठी गुजरातमध्ये

दिल्ली- संसदेचे पहिले सत्र 5 ते 15 जून दरम्यान होण्याची शक्यता

दिल्ली- संसदेचे पहिले सत्र 5 ते 15 जून दरम्यान होण्याची शक्यता, याच दरम्यान मोदी सरकार पहिले बजेट सादर करणार, राष्ट्रपतींच्या भाषणाने संसदेतील सत्राला सुरुवात होणार,

26/05/2019,3:20PM
, LIVE : पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधी मोदी आईच्या आशिर्वादासाठी गुजरातमध्ये

मुंबई- पश्चिम दृतगती मार्गावर चालत्या गाडीला आग

गाडी संपूर्णपणे जळून खाक, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट, सुदैवाने जीवितहानी नाही

26/05/2019,2:01PM
, LIVE : पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधी मोदी आईच्या आशिर्वादासाठी गुजरातमध्ये

पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रगती एक्सप्रेसचे इंजिन फेल,

26/05/2019,12:52PM
, LIVE : पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधी मोदी आईच्या आशिर्वादासाठी गुजरातमध्ये

नागपुरमध्ये उन्हाचा कहर

नागपुरचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आज 46.3 वर नागपुरचा पारा पोहचला आहे. होरपळणाऱ्या उन्हामुळे नागपूरकर हैराण झाले आहेत. हवामान खात्याकडूनही ऑरेंज अलर्ट सांगण्यात आलं आहे. तसेच तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.

26/05/2019,11:39AM
, LIVE : पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधी मोदी आईच्या आशिर्वादासाठी गुजरातमध्ये

गोदावरी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

नाशिक : फ्लोटर सुटल्याने पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना निफाड तालुक्यातील कोठुरे येथे घडली. करण विजय जाधव असं मृत तरुणाचे नाव आहे. सुट्ट्या असल्यामुळे करण मित्रांसोबत गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेला होता. मात्र फ्लोटर सुटल्याने तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. सायखेडा येथील NDRF टीमने एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढला आहे.

26/05/2019,9:22AM
, LIVE : पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधी मोदी आईच्या आशिर्वादासाठी गुजरातमध्ये

गोकुळ दूध संघाकडून दुधाच्या खरेदी दरात दोन रुपयांची वाढ

गोकुळ दूध संघाकडून गाईच्या दूध खरेदी दरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. लवकरच विक्री दरामध्येही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 21 मे पासून बिलामध्ये नव्या दराचा समावेश असणार आहे. सध्या 23 रुपये प्रति लिटर दुधाची खरेदी आहे, ती आता 25 रुपये होणार आहे. गाईच्या दुधाची 42 रुपयांची विक्रीही आता 44 रुपये होऊ शकते.

26/05/2019,8:45AM
, LIVE : पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधी मोदी आईच्या आशिर्वादासाठी गुजरातमध्ये

अमेठीमध्ये भाजपा कार्यकर्त्याची हत्या

अमेठीत भाजप कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. भाजपच्या केंद्रीयमंत्री स्मृती ईराणी या विजयी झाल्याचा जल्लोष केल्यामुळे ही हत्या करण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तिकडून गोळ्या घालून ही हत्या करण्यात आली आहे. सुरेंद्र सिंह असं मृत व्यक्तीचे नाव आहे. अमेठीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि स्मृती ईराणी यांच्यात अटीतटीची लढत झाली होती. यामध्ये स्मृती ईराणी यांनी राहुल गांधींचा दारुण पराभव केला.

26/05/2019,8:15AM
, LIVE : पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधी मोदी आईच्या आशिर्वादासाठी गुजरातमध्ये

केरळ आयसीसच्या निशाण्यावर, गुप्तचर यंत्रणेकडून हायअलर्ट

केरळ : केरळमध्ये गुप्तचर यंत्रणेकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. आयसीसचे 15 अतिरेकी बोटीद्वारे श्रीलंकेकडून लक्षद्विपकडे रवाना. असा संशय गुप्तचर यंत्रणेकडून व्यक्त करण्यात आला आहे.

26/05/2019,7:41AM
, LIVE : पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधी मोदी आईच्या आशिर्वादासाठी गुजरातमध्ये

साताऱ्यात बापाकडून मुलाचा खून

सातारा : कराडमध्ये बापाने लोखंडी पारळीने मारहाण करुन मुलाचा खून केल्याची धक्कादायक अशी घटना घडली. ही घटना कराडमधील तारळे विभागातील कोंजवडे येथे घडली. मजुरीच्या मिळालेल्या पैशाच्या कारणावरुन दारु पिलेल्या बाप-लेकात हाणामारी झाल्याने बापाने मुलाचा खून केला. मारुती उर्फ पवार (30) असं मृत मुलाचे नाव आहे. उंब्रज पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपी वडील भाऊ बापूसो पवार (55) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

26/05/2019,7:26AM
, LIVE : पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधी मोदी आईच्या आशिर्वादासाठी गुजरातमध्ये

नागपुरच्या अंबाझरी जंगलात भीषण आग

नागपूर : नागपुरच्या अंबाझरी जंगलात भीषण आग. आगीत कोणत्याही प्रकराची जीवितहानी झाली नसून आगीच कारण अद्याप अस्पष्ट आहे.

26/05/2019,7:21AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *