“वचन द्या, एकही घर विकायचं नाही”, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते म्हाडाच्या घरांची सोडत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते घरांची संगणकीय सोडत काढण्यात आली. या यादीत एकूण 3894 घरांच्या सोडतीची घोषणा झाली.

वचन द्या, एकही घर विकायचं नाही, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते म्हाडाच्या घरांची सोडत
Follow us
| Updated on: Mar 01, 2020 | 1:36 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (1 मार्च) घरांची संगणकीय सोडत काढण्यात आली (Mhada houses lucky draw). वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या म्हाडा मुख्यालयात ही सोडत काढण्यात आली. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या या यादीत एकूण 3894 घरांच्या सोडतीची घोषणा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी गिरणी कामगारांना आणि त्यांच्या वारसांकडून या हक्काच्या घरांपैकी एकही घर विकणार नाही, असं वचन घेतलं.

उद्धव ठाकरे म्हणाले, “तुमच्यामुळे आज आम्ही आहोत. कित्येक लोकांनी यात बलिदान दिलं आहे. त्यामुळे आज तुमच्यासाठी काही केलं नाही, तर इतिहासात आमची नतद्रष्ट म्हणून नोंद होईल. म्हणूनच हे सगळं करायचं आहे. ही घरं तुमच्यासाठी देतो आहे. मला वचन द्या, यातील एकही घर विकायचं नाही. रक्त सांडवून मिळवलेली मुंबई आपली आहे. तिला विकून जाऊ नका.”

मी गिरणी कामगारांमध्येच लहानाचा मोठा झालो आहे. हे तुमचं ऋण आहे. त्यातून मी मुक्त होऊ शकत नाही. मी आज येथे तुमच्यासमोर मुख्यमंत्री म्हणून आलेलो नाही. तुमच्यासाठी कितीही केलं तरी ते कमीच असेल, असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं. तसेच बाजारात घरांची किंमत वाढली असली, तरी या सोडतींच्या घरांची किंमत साडेनऊ लाख रुपये इतकीच असेल, असंही ठाकरे यांनी सांगितलं.

या कार्यक्रमाला मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, परिवहन मंत्री अनिल परब यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांचंही कौतुक केलं. ते म्हणाले, “जितेंद्र आव्हाड यांना पूर्वी टीव्हीवर बघायचो. तेव्हा ते काय बोलताय, कशासाठी बोलताय हे कळत नसायचं. आता जवळ आल्यावर ते कसे आहेत हे कळतंय.”

दरम्यान, म्हाडाचा मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे चौथ्या टप्प्यांतर्गत गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांसाठी मुंबईच्या मध्यवर्ती भागात सदनिका बांधण्यात आल्या आहेत. यात बॉम्बे डाईंग टेक्सटाईल मिल, बॉम्बे डाईंग स्प्रिंग मिल आणि श्रीनिवास मिलच्या जागांवरील सदनिकांचा समावेश आहे. श्रीनिवास मिलमध्ये 544 घरांसाठी 4850 अर्ज प्राप्त झाले होते, बॉम्बे डाईंग मिलमध्ये 720 घरांसाठी 5518 अर्ज प्राप्त झाले होते, स्प्रिंग मिल येथील 2630 घरांसाठी 5778 अर्ज प्राप्त झाले होते. एकंदरीत 3894 घरांसाठी 16146 अर्ज आले होते.

श्रीनिवास मिल येथील पहिल्या सोडतीमधील विजेते

1) कृष्णा काकडे 2) शोभना सिंग 3) भगवती सकपाळ

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बंद पडलेल्या गिरण्यांमधील गिरणी कामगारांना घरे देण्याच्या शासनाच्या धोरणात्मक निर्णयाच्या अनुषंगाने मुंबई मंडळातर्फे वडाळा येथील बॉम्बे डाईंग मिल गृहप्रकल्पातंर्गत 720 सदनिका बांधण्यात आल्या आहेत. तसेच बॉम्बे डाईंग (स्प्रिंग मिल) येथे 2630 सदनिका आणि लोअर परेल येथील श्रीनिवास मिलच्या जागी 544 सदनिका बांधण्यात आल्या आहेत. मुंबईतील सर्वात उच्चभ्रू ठिकाणी उभारण्यात आलेल्या गृहप्रकल्पातील 225 चौ फुटांच्या वन बीएचके स्वरुपातील सदनिका अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त आहेत. तसेच आधुनिक काळाची गरज लक्षात घेता वडाळा येथील बॉम्बे डाईंग मिल गृहप्रकल्पाच्या आवारात 15 मजल्यांचे वाहनतळ इमारत (पार्किंग टॉवर) उभारण्यात आले आहे.

2010 मध्ये म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत गिरणी कामगारांची माहिती संकलित करण्यासाठी विशेष मोहिम राबवण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान गिरणी कामगारांकडून एकूण 1 लाख 10 हजार 323 अर्ज प्राप्त झाले. मात्र या मोहिमेत मृत गिरणी कामगारांच्या वारसांना अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध व्हावी म्हणून सन 2011 मध्ये पुन्हा गिरणी कामगार वारसांकडून अर्ज मागवण्यात आले. त्यानुसार 38 हजार 388 अर्ज प्राप्त झाले. या दोन्ही मोहिमांअंतर्गत सहभागी न होऊ शकलेल्या अर्जदारांना समाविष्ट करुन घेण्यासाठी सन 2017 मध्ये पुन्हा माहिती संकलन मोहीम राबवण्यात आली. अशाप्रकारे गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांनी एकूण 1 लाख 74 हजार 36 अर्ज केले.

यापूर्वी मुंबई मंडळातर्फे गिरणी कामगार सदनिका सोडतीच्या पहिल्या टप्प्यांतर्गत 6 हजार 925 सदनिकांची संगणकीय सोडत 28 जून 2013 रोजी काढण्यात आली होती. दुसऱ्या टप्प्यांतर्गत 2634 सदनिकांची सोडत 9 जून 2016 रोजी काढण्यात आली. तिसऱ्या टप्प्यांतर्गत एमएमआरडीएकडून भाडेतत्त्वावरील गृहनिर्माण योजनेअंतर्गत (रेंटल हौसिंग स्कीम) प्राप्त झालेल्या पनवेल तालुक्यातील मौजे कोन येथे (160 चौरस फुटांच्या 2 सदनिका मिळून एक) अशा 2 हजार 634 जोड सदनिकांची सोडत 2 डिसेंबर 2016 मध्ये काढण्यात आली. अशाप्रकारे अद्यापपर्यंत मुंबई मंडळातर्फे एकूण 11 हजार 976 सदनिकांपैकी 8 हजार 490 सदनिकांचा ताबा गिरणी कामगारांना देण्यात आला आहे.

Mhada houses lucky draw

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.