उद्धव ठाकरेंच्या दिल्ली भेटीनंतर 'वर्षा'वर तातडीची बैठक, शरद पवार, अजित पवारांशी तासभर चर्चा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी महत्त्वाची (Maha vikas aaghadi meeting on Varsha bungalow) बैठक होत आहे.

Maha vikas aaghadi meeting on Varsha bungalow, उद्धव ठाकरेंच्या दिल्ली भेटीनंतर ‘वर्षा’वर तातडीची बैठक, शरद पवार, अजित पवारांशी तासभर चर्चा

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी महत्त्वाची (Maha vikas aaghadi meeting on Varsha bungalow) बैठक झाली. या बैठकीला स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि  शिवसेना खासदार संजय राऊतही उपस्थित होते. शरद पवार दुपारी चारच्या सुमारास वर्षा बंगल्यावर दाखल झाले. (Maha vikas aaghadi meeting on Varsha bungalow) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिल्लीत मॅरेथॉन बैठका घेतल्यानंतर, आज शरद पवारांसोबत बैठक झाल्याने या बैठकीकडे राजयकी वर्तुळाचं विशेष लक्ष होतं.

जवळपास तासभर ही बैठक चालली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कालच दिल्ली दौऱ्यावर गेले होते. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन माध्यमांशी संवाद साधत, सीएए कायद्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली होती. उद्धव ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर महाविकास आघाडीत मतमतांतरे होत आहेत. कारण काँग्रेसने सीएए, एनआरसी आणि एनपीए कायद्याला जाहीर विरोध दर्शवला आहे. त्यामुळे या कायद्यावरुन आघाडीतील सत्ताधारी तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता आहे.  उद्धव ठाकरे यांनी दिल्ली भेटीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचीही भेट घेतली होती. सोनिया गांधींसोबतही उद्धव ठाकरे यांनी विविध विषयावर चर्चा केली होती.

दुसरीकडे भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेच्या तपासावरुनही काहीशी मतमतांतरे आहेत. भीमा कोरेगावचा तपास एनआयएला दिला आहे. मात्र तपास राज्यातील विशेष तपास पथकाद्वारे व्हावा अशी भूमिका राष्ट्रवादीची आहे. त्यामुळे या भेटीत त्याबाबतही चौकशी झाली असावी.

अधिवेशनाची चर्चा शक्य

दरम्यान, राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाला येत्या सोमवारपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. शिवाय अधिवेशनात कोणकोणत्या मुद्द्यावर चर्चा व्हावी, विरोधकांचा सामना कसा करावा, याबाबतची रणनीतीही या बैठकीत ठरल्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या 

केवळ शिवसेनेनं नाही तर काँग्रेसनेही CAA समजून घ्यावा : कुमार केतकर

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *