मुंबईत मतांचा टक्का वाढला, मावळच्या जागेकडेही महाराष्ट्राचं लक्ष

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 जागांसाठी मतदान पार पडलंय. चार टप्प्यांमध्ये हे मतदान झालं. चौथ्या टप्प्यातील मतदानानंतर आता निकालाची प्रतीक्षा आहे. काही ठिकाणी मतदान कमी झालंय, तर काही ठिकाणी मतदान कमी झालंय. त्यामुळे सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. चौथ्या टप्प्यात मुंबईतील सहा जागांसाठी मतदानाचा टक्का वाढल्यामुळे विद्यमान खासदारांची धाकधूक वाढली आहे. तर मावळमध्ये राष्ट्रवादी …

मुंबईत मतांचा टक्का वाढला, मावळच्या जागेकडेही महाराष्ट्राचं लक्ष

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 जागांसाठी मतदान पार पडलंय. चार टप्प्यांमध्ये हे मतदान झालं. चौथ्या टप्प्यातील मतदानानंतर आता निकालाची प्रतीक्षा आहे. काही ठिकाणी मतदान कमी झालंय, तर काही ठिकाणी मतदान कमी झालंय. त्यामुळे सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. चौथ्या टप्प्यात मुंबईतील सहा जागांसाठी मतदानाचा टक्का वाढल्यामुळे विद्यमान खासदारांची धाकधूक वाढली आहे. तर मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार उभे असल्याने पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

चौथ्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी

चौथ्यात टप्प्यात 57 टक्के मतदान झालं आणि यासह महाराष्ट्रातील सर्व 48 जागांवरील रणसंग्राम थांबला.

उत्तर मुंबईत यंदा 59.32% तर 2014 मध्ये 51.67% मतदान झालं होतं.

वायव्य मुंबई 54.71% तर 2014 मध्ये 50.56% मतदानाची नोंद होती.

ईशान्य मुंबईत यावेळी 56.31% तर गेल्यावेळी 52.76% मतदान झालं होतं.

उत्तर मध्य मुंबई 52.84 % मतदान झालं, तर 2014 मध्ये 49.37% मतदान झालं होतं.

दक्षिण मध्य मुंबईत 55.35% मतदान झालं, तर 2014 मध्ये ही आकडेवारी 53.28% एवढी होती.

दक्षिण मुंबईत 52.15% मतदान झालं, तर 2014 मध्ये 52.19% मतदान झालं.

भिवंडीत 53.68% मतदान झालं, 2014 मध्ये 51.62% मतदानाची नोंद झाली होती.

कल्याणमध्ये  44.27% मतदान झालं, 2014 मध्ये ही आकडेवारी 43.06% होती.

ठाण्यात 49.95% मतदान झालं, गेल्या निवडणुकीत 51.84% मतदान झालं होतं.

नंदुरबारमध्ये 67.64 % मतदान झालं, 2014 मध्ये 66.63 % मतदान झालं होतं.

धुळ्यात 57.29% मतदान झालं, 2014 मध्ये 58.52% मतदान झालं होतं.

दिंडोरीत 64.24% मतदान झालं, तर 2014 मध्ये 63.53% मतदान झालं होतं.

नाशिकमध्ये  55.41% मतदानांची नोंद झाली, 2014 मध्ये 59.14% मतदान झालं होतं.

पालघरमध्ये  64.09% मतदान झालं, तर 2014 मध्ये ही आकडेवारी 63.49% होती.

मावळमध्ये 59.12% मतदान झालंय, गेल्या निवडणुकीत 60.16% मतदान झालं होतं.

शिरुरमध्ये 59.55% मतदान झालं, 2014 च्या निवडणुकीत 59.77% मतदान झालं होतं.

शिर्डीत 60.42% मतदान झालं, 2014 मध्ये 63.97% झालं होतं.

युतीसमोर चौथ्या टप्प्यातील जागा राखण्याचं आव्हान

2014 ची ताकद पाहता भाजपचे 8 आणि शिवसेनेचे 9 खासदार आहेत. युतीचाच दबदबा पाहता यंदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही आपली ताकद झोकून दिली होती. मुंबईचा विचार केला तर गेल्या वेळच्या तुलनेत मतदानाचा टक्का वाढलाय. तर उर्वरित जागांवरही चुरशीची लढाई आहे.

मतदान पार पडलंय. मात्र दिग्गजांबरोबच मावळमधून अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार, शिरुरमधून डॉ. अमोल कोल्हे, मुंबईतून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्याकडे खास नजरा आहेत. अमोल कोल्हे आणि पार्थ पवार यांच्यासमोर शिवसेना उमेदवारांचं, तर उर्मिला मातोंडकरसमोर भाजपच्या गोपाळ शेट्टींचं आव्हान आहे.

VIDEO : 48 जागांचा लेखाजोखा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *