राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाची तारीख ठरली

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. कारण चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. राज्याचे अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधीमंडळातील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान ही  माहिती दिली. यापूर्वी आधी गणेश चतुर्थीला, मग दिवाळीत सातवा वेतन आयोग लागू होईल असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं. मात्र आजपर्यंत सातवा वेतन आयोग लागू …

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाची तारीख ठरली

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. कारण चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. राज्याचे अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधीमंडळातील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान ही  माहिती दिली. यापूर्वी आधी गणेश चतुर्थीला, मग दिवाळीत सातवा वेतन आयोग लागू होईल असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं. मात्र आजपर्यंत सातवा वेतन आयोग लागू झाला नाही. आता त्याला 1 जानेवारीचा मुहूर्त देण्यात आला.

दुसरीकडे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासूनच सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. पण अजूनही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना त्याचे लाभ मिळाले नाहीत. आता 1 जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू होण्याची आशा आहे. वेतन आयोग लागू करताना थकबाकीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या पीएफमध्ये जमा होईल, असं सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वी सांगितलं होतं.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी अर्थसंकल्पात 10 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सातवा वेतन आयोग लागू केल्यास, राज्यातील सुमारे 17 लाख कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल. यामध्ये शासकीय, जिल्हा परिषद कर्मचारी, अधिकारी, पोलीस, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *