मुनगंटीवार, क्षीरसागरांना बंगला सोडण्यासाठी नोटीस

सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या आठवड्यात माजी मंत्र्यांना नोटीस बजावून, बंगले (former ministers bungalow) सोडण्याचे आदेश दिले आहेत.

मुनगंटीवार, क्षीरसागरांना बंगला सोडण्यासाठी नोटीस

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या आठवड्यात माजी मंत्र्यांना नोटीस बजावून, बंगले (former ministers bungalow) सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यातील बहुतांश नेत्यांनी बंगले सोडले आहेत. पण माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेनेत दाखल झालेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी अद्याप बंगले सोडलेले नाहीत.  (former ministers bungalow)

सार्वजनिक बांधकाम खात्याने गेल्या आठवड्यात बंगले सोडण्याबाबत 9 माजी मंत्र्यांना नोटीस दिले बजावली होती. यामध्ये सुधीर मुनगंटीवार, जयदत्त क्षीरसागर यांच्यासह दीपक केसरकर, रामदास कदम, मदन येरावर, अविनाश महातेकर, सुभाष देशमुख,सुरेश खाडे आणि अर्जुन खोतकर यांचा समावेश होता. यापैकी मुनगंटीवार आणि क्षीरसागर वगळता सर्वांनी बंगले सोडले आहेत. आता हे दोन्ही नेते बंगले कधी सोडणार हे पाहमं महत्त्वाचं ठरणार आहे.

नोटीस बजावलेले मंत्री

  1. सुधीर मुनगंटीवार (सोडला नाही)
  2. जयदत्त क्षीरसागर (सोडला नाही)
  3. दीपक केसरकर
  4. रामदास कदम
  5. मदन येरावर
  6. अविनाश महातेकर
  7. सुभाष देशमुख
  8. सुरेश खाडे
  9. अर्जुन खोतकर
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *