कर्नाटकच्या आमदारांचा राजीनामा मागे घेण्याची मागणी करत आंदोलन, काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

कर्नाटक काँग्रेसच्या 11 आमदारांनी त्यांचा राजीनामा परत घ्यावा, यासाठी महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईच्या सोफिटेल हॉटेलसमोर आंदोलन केलं. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात घोषणाबाजीही केली. परिस्थिती चिघळू नये म्हणून स्थानिक पोलिसांनी या युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

, कर्नाटकच्या आमदारांचा राजीनामा मागे घेण्याची मागणी करत आंदोलन, काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : कर्नाटक काँग्रेसच्या 11 आमदारांनी त्यांचा राजीनामा परत घ्यावा, यासाठी महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईच्या सोफिटेल हॉटेलसमोर आंदोलन केलं. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात घोषणाबाजीही केली. परिस्थिती चिघळू नये म्हणून स्थानिक पोलिसांनी या युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सूरज सिंह ठाकूर यांचाही समावेश आहे.

कर्नाटकातील काँग्रेस आणि जेडीएसच्या 11 आमदारांनी शनिवारी (6 जुलै) विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जाऊन राजीनामा दिला. त्यानंतर हे सर्व आमदार मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील सोफिटेल हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेससह भाजपचे अनेक नेते काँग्रेस-जेडीएस आमदारांची मनधरणी करण्यासाठी सोफिटेल हॉटेलमध्ये पोहचले.

याचवेळी मुंबई युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सूरज सिंह ठाकूर यांनीही सोफिटेल हॉटेलच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. मुंबई युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह सूरज सिंह ठाकूर यांनी सोफिटेल हॉटेलसमोर आंदोलन करण्यास सुरुवात केली. 11 आमदारांनी त्यांचा राजीनामा परत घ्यावा, अशी मागणी करत युवक काँग्रेसच्या कार्यकर्ते घोषणाबाजी करु लागले. यावेळी त्यांनी भाजपविरोधा घोषणाही दिल्या. तसेच, भाजप सत्तेसाठी घोडेबाजार करत असल्याचा आरोप युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावला. युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना आक्रमक झाल्याचं पाहून पोलिसांनी उपाध्यक्ष सूरज सिंह ठाकूर यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

नेमकं प्रकरण काय?

कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएसच्या 11 आमदारांनी शनिवारी (6 जुलै) विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जाऊन राजीनामा दिला होता. राजीनामा दिलेल्या आमदारांमध्ये काँग्रेसचे 8, तर जेडीएसचे 3 आमदार आहेत. त्यानंतर हे सर्व आमदार मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील सोफिटेल हॉटेलमध्ये पोहोचले. त्यानंतर काँग्रेससह भाजपच्याही नेत्यांनी सोफिटेल हॉटेल गाठले.

कर्नाटकमध्ये सध्या सत्ताकारणासाठी चांगले नाटक रंगताना दिसत आहे. नुकंतच भाजप नेते प्रसाद लाड आणि भाजप मुंबईचे अध्यक्ष मोहित कंबोज यांनी राजीनामा दिलेल्या काँग्रेस-जेडीएस आमदारांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच उद्या (8 जुलै) राजीनामा दिलेले काही आमदार शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी जाणार असल्याचे म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे या 11 आमदारांसह आणखी काही आमदार राजीनामा देणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये सत्तांतर होणार असल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसचे 10 आमदार मुंबईत दाखल झाल्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांचं सरकार पाडण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

पाहा व्हिडीओ : 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *