शहापुरात भीषण अपघात, आईसमोर 35 वर्षीय मुलाचा मृत्यू

शहापूर (ठाणे) : मुंबई-नाशिक महामार्गावर चांदे (खर्डी) येथे रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारस भीषण अपघात झाला. या अपघातात आई जखमी, तर तिच्या 35 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. शहापूर तालुक्यातील कुकांबे येथील काशीनाथ चौधरी (वय-35 वर्षे) हे आपली आई कुसुम चौधरी (वय-55 वर्षे) हिच्या सोबत दळखन येथून हळदी समारंभ करून येत असताना, त्यांच्या दुचाकीला व्हॅगनर गाडीने …

शहापुरात भीषण अपघात, आईसमोर 35 वर्षीय मुलाचा मृत्यू

शहापूर (ठाणे) : मुंबई-नाशिक महामार्गावर चांदे (खर्डी) येथे रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारस भीषण अपघात झाला. या अपघातात आई जखमी, तर तिच्या 35 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला.

शहापूर तालुक्यातील कुकांबे येथील काशीनाथ चौधरी (वय-35 वर्षे) हे आपली आई कुसुम चौधरी (वय-55 वर्षे) हिच्या सोबत दळखन येथून हळदी समारंभ करून येत असताना, त्यांच्या दुचाकीला व्हॅगनर गाडीने मागून धडक दिल्याने हा अपघात घडला.

अपघातात काशीनाथ चौधरी यांचा हॉस्पिटलमध्ये नेत असताना रस्त्यात मृत्यू झाला, तर आई कुसुम चौधरी या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर शहापूर उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा हे घोटी येथील कार्यक्रम संपल्यावर शहापूर येत असताना सदर ठिकाणी अपघात घडल्याचे दिसले. आमदार बरोरा यांनी क्षणांचाही विलंब न करता गाडी थांबवून खर्डी पोलीस स्टेशन व उपजिल्हा रुग्णालय येथे त्वरित अपघाताची माहिती दिली. परंतु अपघात एवढा भीषण होता की दोन्ही व्यक्तीला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने आमदारांनी स्वतःच्या वाहनात जखमींना शहापुरातील सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले. परंतु काशीनाथ चौधरी यांना हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर डॉक्टरांनी काशिनाथ यांना मृत घोषित केले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *