मुंबईत मध्यरात्री अग्नितांडव, 30-35 गोदामं जळून खाक

मुंबई : मालाडमधील मालवणी परिसरातील गोदामांना मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत जवळपास 30 ते 35 गोदामं जळून खाक झाली. अग्निशमन दलाने 50 हून अधिक जणांची सुखरुप सुटका करुन, त्यांना सुरक्षित स्थळी हलवलं. बातमीतले महत्त्वाचे मुद्दे : ?मालवणी परिसरातील जवळपास 30 गोदामं जळून खाक ?अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी ?आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश ?50 हून …

, मुंबईत मध्यरात्री अग्नितांडव, 30-35 गोदामं जळून खाक

मुंबई : मालाडमधील मालवणी परिसरातील गोदामांना मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत जवळपास 30 ते 35 गोदामं जळून खाक झाली. अग्निशमन दलाने 50 हून अधिक जणांची सुखरुप सुटका करुन, त्यांना सुरक्षित स्थळी हलवलं.

बातमीतले महत्त्वाचे मुद्दे :

?मालवणी परिसरातील जवळपास 30 गोदामं जळून खाक
?अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी
?आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
?50 हून अधिक लोकांची सुखरुप सुटका
?घटनास्थळी गॅस सिलेंडरचं गोदम, सुदैवाने तिथवर आग पोहोचली नाही

मालाडच्या पश्चिम बाजूस असलेल्या मालवणी परिसरातील झोपडपट्टी भागात ही आग लागली. इंडस्ट्रीयल कंपाऊंड होतं. तिथे गोदामं होती. त्या ठिकाणी गोदामं असल्याने आग अधिक भडकली. या इंडस्ट्रीय कंपाऊंडमध्ये गॅस सिलेंडरचं गोदामही होतं. सुदैवाने तिथवर आग पोहोचली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

, मुंबईत मध्यरात्री अग्नितांडव, 30-35 गोदामं जळून खाक

अग्निशमन दलाच्या आधी आठ आणि नंतर आणखी दोन, अशा एकूण दहा गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. शर्थीचे प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. तरी 30 ते 35 गोदामं जळून खाक झाली आहेत. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आगडोंब इतका मोठा होता की, त्याची झळ आजूबाजूच्या झोपडपट्टीलाही बसली. अनेक गोदामांची राखरांगोळी झाली. तेथील लोकांना बाजूला हलवण्यात अग्मिशमन दलाने प्राधान्य दिले आणि 50 ते 60 जणांना सुखरुप बाजूला नेऊन सुरक्षित ठिकाणी ठेवलं.

Google Map : आग नेमकी कुठे लागली?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *