आधी व्हॉट्सअॅपवर मित्राला मेेसेज, नंतर वाशी पुलावरुन खाडीत उडी

नवी मुंबई : वाशी खाडीपुलावरुन संजय पुजारा या व्यक्तीने उडी मारली. संजय पुजारा हा मुंबईतील वांद्रे येथील रहिवाशी असून, रात्री 9 वाजण्याचा सुमारास वाशी खाडी पुलावर येऊन थांबला. स्कूटी पुलावर उभी करुन खाडीत उडी मारली. खाडीत उडी मारण्याआधी संजय पुजाराने मित्राला व्हॉट्सअॅपवर मेसेज केला होता. नेमकी घटना काय घडली? मुंबईतील वांद्रे येथील रहिवाशी असलेली संजय …

आधी व्हॉट्सअॅपवर मित्राला मेेसेज, नंतर वाशी पुलावरुन खाडीत उडी

नवी मुंबई : वाशी खाडीपुलावरुन संजय पुजारा या व्यक्तीने उडी मारली. संजय पुजारा हा मुंबईतील वांद्रे येथील रहिवाशी असून, रात्री 9 वाजण्याचा सुमारास वाशी खाडी पुलावर येऊन थांबला. स्कूटी पुलावर उभी करुन खाडीत उडी मारली. खाडीत उडी मारण्याआधी संजय पुजाराने मित्राला व्हॉट्सअॅपवर मेसेज केला होता.

नेमकी घटना काय घडली?

मुंबईतील वांद्रे येथील रहिवाशी असलेली संजय पुजारा याने वाशी खाडी पुलावर स्कूटी थांबवली आणि खाडीत उडी टाकली. ही घटना काही जणांनी पाहिली, त्यानंतर तातडे पोलिसांना सांगितले. त्यानंतर वाशी पोलिस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मच्छिमारांच्या मदतीने खाडीत शोधमोहिम हाती घेतली. मात्र, समुद्राला भरती असल्याने संजय पुजाराचा शोध काही लागला नाही. अजूनही शोधमोहीम सुरुच आहे.

पोलिसांनी पुलावर उभी असलेली संजय पुजाराची स्कूटी ताब्यात घेतली. स्कूटीमध्ये पाकीट सापडला. त्यात आधार कार्ड, एटीएम कार्ड आणि सुसाईड नोट सापडली. त्याचसोबत एक मोबाईलही सापडला.

व्हॉट्सअॅपवरुन शेवटचा मेसेज काय केला?

पोलिसांनी मोबाईलचा तपास केला असता, संजय पुजाराने व्हॉट्सअॅपवरुन त्याच्या मित्राला मेसेज केला होता. “मी कर्जामध्ये डुबलो आहे. शिवाय, आजारीही आहे. त्यामुळे मी आता वाशी खाडी पुलावरुन उडी मारतो आहे.” असा मेसेज संजय पुजाराने त्याच्या मित्राला केला होता.

धक्कादायक म्हणजे, संजय पुजारा नामक व्यक्तीने ज्या ठिकाणावरुन खाडीत उडी मारली, त्याच ठिकाणाहून जुईनगर येथील रहिवाशी असलेल्या महिलेनेही खाडीत उडी मारली होती. मात्र, मच्छिमारांनी त्या महिलेचा जीव वाचवला होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *