मराठा आरक्षण LIVE : मराठा क्रांती मोर्चा सर्व आमदारांची भेट घेणार

मुंबई: मराठा समाजाला आरक्षण देणारं विधेयक आज विधीमंडळात मांडण्याची शक्यता होती. मात्र ती आता बारगळली आहे. कारण स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधेयक मांडलं जाणार नाही, अशी माहिती टीव्ही 9 मराठीला दिली. याशिवाय कृती अहवाल म्हणजेच एटीआरही आज मांडण्याबाबत प्रश्नचिन्हं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मात्र दुसरीकडे महाधिवक्ता अशुतोष कुंभकोणी आणि विधीज्ञांची टीम विधिमंडळात दाखल झाली […]

मराठा आरक्षण LIVE : मराठा क्रांती मोर्चा सर्व आमदारांची भेट घेणार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM

मुंबई: मराठा समाजाला आरक्षण देणारं विधेयक आज विधीमंडळात मांडण्याची शक्यता होती. मात्र ती आता बारगळली आहे. कारण स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधेयक मांडलं जाणार नाही, अशी माहिती टीव्ही 9 मराठीला दिली. याशिवाय कृती अहवाल म्हणजेच एटीआरही आज मांडण्याबाबत प्रश्नचिन्हं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मात्र दुसरीकडे महाधिवक्ता अशुतोष कुंभकोणी आणि विधीज्ञांची टीम विधिमंडळात दाखल झाली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा कृती अहवाल सभागृहात मांडण्याबाबत सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. विधीज्ञांची टीम मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीतही सहभागी होणार आहे.

दुसरीकडे मराठा आरक्षणावरुन विरोधक सरकारविरोधात हक्कभंग आणणार आहेत. काँग्रेस आमदार शरद रणपिसे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस दिली आहे.

LIVE UPDATE

  • मराठा आरक्षणाबाबत सभागृहात कोणतीही चर्चा किंवा ठोस भूमिका सरकार आणि विरोधी पक्ष घेत नसल्याने, मराठा ठोक मोर्चा आक्रमक, उद्या दुपारपर्यंत जर सरकार किंवा विरोधकांनी आरक्षणाबाबत ठोस निर्णय न दिल्यास, उद्या मराठा ठोक मोर्चाचे कार्यकर्ते गनिमी कावाच्या माध्यमातून विधीमंडळात घुसून जाब विचारणार -आबासाहेब पाटील –
  • मराठा क्रांती मोर्चा सर्व आमदारांची भेट घेणार, कृती आराखड्याची प्रत देणार, सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम
  • मराठा आरक्षणावरील विधेयक आणि अॅक्शन टेकन रिपोर्ट (ATR) उद्या एकत्रच सादर होण्याची शक्यता, आज दुपारी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक – सूत्रांची माहिती
  • महाधिवक्ता अशुतोष कुंभकोणी आणि विधीज्ञांची टीम विधिमंडळात दाखल, मराठा आरक्षणाचा कृती अहवाल सभागृहात मांडण्याबाबत सरकारच्या हालचालींना वेग, मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत सहभागी होणार
  •  आज विधेयक मांडलं जाणार नाही, आज एटीआर मांडण्यावरही प्रश्नचिन्ह, मुख्यमंत्र्यांची TV 9 ला माहिती

सरकार शब्द पाळणार?

मराठा समाजाने 1 डिसेंबरला जल्लोष करा, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं. त्याप्रमाणे शब्द पाळण्यासाठी सरकारकडून युद्ध पातळीवर हालचाली सुरु आहेत. 16 टक्के आरक्षण देण्यास उपसमितीने मंजुरी दिली आहे. उपसमितीचे सदस्य एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षण विधेयकाबाबत शिवसेनेलाही विश्वासात घेतलं आहे. ‘मातोश्री’वर जाऊन त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही मराठा आरक्षणाबाबत चर्चा केली असल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.

मराठा आरक्षण विषयावर चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना माहिती दिली. उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत समाधान व्यक्त केल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं. शिवाय कोर्टात टिकणारं आरक्षण मराठा समाजाला देण्याची ग्वाही उद्धव ठाकरे यांना दिली असल्याचंही ते म्हणाले.

मराठा आरक्षणाबाबत वैधानिक कार्यवाही करण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आलेली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील या समितीचे अध्यक्ष आहेत. तर शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक उपक्रम बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, जलसंधारण मंत्री राम शिंदे, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा हे या उपसमितीचे सदस्य आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सह सदस्य आहेत.

कॅबिनेटने मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील शिफारशी 18 नोव्हेंबरला स्वीकारल्या. त्यानंतर मंत्रीमंडळ उपसमितीची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली होती. आरक्षणाबाबतची वैधानिक कार्यवाही करण्याचा अधिकार मंत्रीमंडळ समितीला देण्यात आला आहे आणि याच समितीचा निर्णय अंतिम असेल. विचारविनिमयासाठी गरजेनुसार तज्ञ, विधिज्ञ आणि संबंधित अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्याचे अधिकार या उपसमितीला देण्यात आले आहेत.

शिवसेना-भाजपच्या आमदारांना व्हीप जारी

मराठा आरक्षण विधेयक सभागृहात आणण्यापूर्वी भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांना पक्षाकडून व्हीप जारी करण्यात आलाय. बहुमताने विधेयक पास व्हावं आणि विरोधकांच्या विरोधाचा सामना ताकदीने करता यावा यासाठी सरकारने आतापासूनच योजना आखली आहे. विधेयक 29 आणि 30 तारखेला अनुक्रमे दोन्ही सभागृहात मंजूर केलं जाईल आणि त्यानंतर राज्यपालांच्या स्वाक्षरीने त्याचं कायद्यात रुपांतर होईल. सर्व आमदार सभागृहात उपस्थित असावेत यासाठी शिवसेना-भाजपने आपापल्या आमदारांना पुढील तीन दिवस अधिवेशनात उपस्थित राहण्याबाबत व्हीप जारी केलाय.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.