पंकजांच्या नाराजीचं कारण समजलं, तरीही म्हणतात मी नाराज नाही!

मुंबई:  राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे या मराठा आरक्षणाबाबतच्या उपसमितीच्या सदस्य नसूनही त्याबाबतच्या बैठकीत घुसल्या होत्या. त्यानंतर त्या अवघ्या 15 मिनिटात नाराज होऊन बाहेर पडल्या. त्यांच्या नाराजीचं कारण आता समोर आलं आहे. “कुणबी आणि मराठा यांना एकत्र मिळून आरक्षणाची टक्केवारी देण्यावरुन पंकजा मुंडे यांनी प्रश्न उपस्थित केले. कुणबी मराठा आधीच ओबीसीमध्ये आहेत. मराठ्यांना कुणबी […]

पंकजांच्या नाराजीचं कारण समजलं, तरीही म्हणतात मी नाराज नाही!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM

मुंबई राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे या मराठा आरक्षणाबाबतच्या उपसमितीच्या सदस्य नसूनही त्याबाबतच्या बैठकीत घुसल्या होत्या. त्यानंतर त्या अवघ्या 15 मिनिटात नाराज होऊन बाहेर पडल्या. त्यांच्या नाराजीचं कारण आता समोर आलं आहे. “कुणबी आणि मराठा यांना एकत्र मिळून आरक्षणाची टक्केवारी देण्यावरुन पंकजा मुंडे यांनी प्रश्न उपस्थित केले. कुणबी मराठा आधीच ओबीसीमध्ये आहेत. मराठ्यांना कुणबी मराठा वगळून आरक्षण देण्याचा मुद्दा पंकजा मुंडे यांनी मांडला. पंकजा यांनी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांच्याकडे प्रश्न मांडले. याबाबत तिघांमध्ये धुसफूस झाल्याची पाहायला मिळालं. त्यानंतर पंकजा मुंडे थेट या बैठकीतून बाहेर पडल्या.

मी नाराज नाही – पंकजा मुंडे 

दरम्यान, मी मराठा आरक्षणावरुन नाराज नाही असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलं. या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर पंकजांनी माध्यमांशी संवाद साधला.

सदस्य नसताना पंकजा मुंडे बैठकीत घुसल्या, नाराज होऊन 15 मिनिटात बाहेर पडल्या!

दरम्यान, आज सकाळी मराठा आरक्षणाबाबतची उपसमितीची बैठक बोलावण्यात आली होती. सकाळी साडेदहा वाजता या बैठकीला सुरुवात झाली. चंद्रकांत पाटील हे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहेत. मात्र आजच्या बैठकीला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटात महिला बालविकास मंत्री आणि ओबीसी नेत्या पंकजा मुंडे याबैठकीतून बाहेर पडल्या. पंकजा मुंडे मराठा आरक्षणाच्या टक्केवारीवरुन नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे.

मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत सदस्य नसताना सुद्धा पंकजा मुंडे आत शिरल्या. त्या पोटतिडकीने काही प्रश्न चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांच्याकडे मांडत होत्या.  चंद्रकांत पाटील आणि  गिरीश महाजन त्यांना काही तरी मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न करत  होते. आरक्षणाच्या टक्केवारीवरून वाद असल्याचा अंदाज आहे.

मराठा समाजाला 10 किंवा 16 टक्के आरक्षण मिळण्याची शक्यता आहे. त्याबाबतच या बैठकीत चर्चा झाली. मात्र ओबीसींच्या आरक्षणाला तसेच 52 टक्के आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्या अशी मागणी ओबीसी नेत्यांची आहे. तर मराठा आरक्षण स्वतंत्र देणार, कोणत्याही आरक्षणाला धक्का लावणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी सांगितलं आहे. मात्र तरीही ओबीसी नेत्यांमध्ये धूसफूस आहे.

उपसमितीत कोण कोण आहे?

मराठा आरक्षणाबाबत वैधानिक कार्यवाही करण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आलेली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील या समितीचे अध्यक्ष आहेत. तर शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक उपक्रम बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, जलसंधारण मंत्री राम शिंदे, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा हे या उपसमितीचे सदस्य आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सह सदस्य आहेत.

समितीकडे अधिकार काय?

कॅबिनेटने मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील शिफारशी 18 नोव्हेंबरला स्वीकारल्या. त्यानंतर मंत्रीमंडळ उपसमितीची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली होती. आरक्षणाबाबतची वैधानिक कार्यवाही करण्याचा अधिकार मंत्रीमंडळ समितीला देण्यात आला आहे आणि याच समितीचा निर्णय अंतिम असेल. विचारविनिमयासाठी गरजेनुसार तज्ञ, विधिज्ञ आणि संबंधित अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्याचे अधिकार या उपसमितीला देण्यात आले आहेत.

मराठा समाजाला किती टक्के आरक्षण मिळू शकतं?

मराठा आरक्षणाचे विधेयक आज विधिमंडळामध्ये अपेक्षित आहे. हे विधेयक कसे असेल याची अजून निश्चिती झाली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा मागास असल्याचे मान्य करत त्यांना आरक्षण देण्यात येईल. मराठा समाजाला 16% आरक्षण देण्याची शिफारस विधेयकात असेल. शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये हे 16 % आरक्षण असेल. राज्य सरकारच्या अधिकारातील घटनेच्या कलम 15(4) आणि 16(4) च्या आधारे मराठा समाजाला आरक्षण पुरवले जाईल. मराठ्यांना मिळणारे आरक्षण हे राजकीय क्षेत्रातले नाही. त्यामुळे पंचायत राज कायद्यानुसारच्या आरक्षणाचा त्यात समावेश नसेल.

Live Tv

संबंधित बातमी

मराठ्यांना 16 टक्के आरक्षण मिळाल्यास महाराष्ट्रातील परिस्थिती कशी असेल?

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.