मध्य रेल्वेवर आज सहा तासांचा जम्बो मेगा ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेवर आज सहा तासांचा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे. मध्य रेल्वेवर मस्जिद बंदरच्या जुन्या पुलाचं काम करण्यात येणार असल्यामुळे मस्जिद बंदर ते सँडहर्स्ट रोड मार्गावर सकाळी 10.30 ते संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. तसेच मध्यमार्गावरील गाड्या भायखळा तर हार्बर मार्गावरील गाड्या वडाळा स्थानकापर्यंत सुरु राहतील. या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांच्या सोयीकरीता बेस्ट …

, मध्य रेल्वेवर आज सहा तासांचा जम्बो मेगा ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेवर आज सहा तासांचा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे. मध्य रेल्वेवर मस्जिद बंदरच्या जुन्या पुलाचं काम करण्यात येणार असल्यामुळे मस्जिद बंदर ते सँडहर्स्ट रोड मार्गावर सकाळी 10.30 ते संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. तसेच मध्यमार्गावरील गाड्या भायखळा तर हार्बर मार्गावरील गाड्या वडाळा स्थानकापर्यंत सुरु राहतील. या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांच्या सोयीकरीता बेस्ट प्रशासन ज्यादा बस सोडणार आहे.

सीएसएमटीवरुन कल्याणसाठी शेवटची लोकल सकाळी 10.14 वाजता  सुटेल तर भायखळवरुन 10.22 वाजता सुटणारी लोकल शेवटची असेल. सीएसएमटीवरुन पनवेलला जाणारी शेवटची लोकल 10.10 वाजता तर वडाळावरुन 10.28 वाजता सुटेल. यानंतर सहा तासांच्या मेगा ब्लॉकमध्ये मध्य रेल्वेवरील धिम्या मार्गावरील सर्व गाड्या भायखळा स्थानक आणि हार्बर स्थानकापर्यंत सुरु राहतील.

मस्जिद बंदर येथील पादचारी पूलाचे काम करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येत आहे. मस्जिद बंदर येथील पूल असुरक्षित असल्यामुळे मध्य रेल्वेने याच्या दुरस्तीचे काम हाती घेतलं आहे. या ब्लॉक दरम्यान भायखळा ते सिएसएमटी दरम्यान धिम्या मार्गावरील गाड्या या जलद मार्गावर चालवण्यात येणार आहे. मेगाब्लॉकमुळे प्रवाशांची चांगलीच पंचायत होणार असल्याचे दिसत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *