मुंबईतील मानखुर्दच्या झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळावर

मुंबईतील मानखुर्द मढाला येथे झोपडपट्टीतील प्लास्टिक गोडाऊनला लेव्हल 3 ची भीषण आग लागली आहे (Massive Fire in Mankhurd Slum Mumbai)

मुंबईतील मानखुर्दच्या झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळावर

मुंबई : मुंबईतील मानखुर्द मढाला येथे झोपडपट्टीला लेव्हल 3 ची भीषण आग लागली आहे (Massive Fire in Mankhurd Slum Mumbai). या घटनेनंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळावर रवाना झाल्या आहेत. अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रणासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी झोपडपट्टीतील प्लॅस्टिक भंगार गोडाऊनला ही आग लागली.

मानखुर्दमधील निलकंठेश्वर झोपडपट्टीत प्लॅस्टिक भंगारचं गोडाऊन आहे. सकाळी अचानक तेथून धुराचे लोड निघू लागले. त्यानंतर आग लागल्याचं समोर आलं. यानंतर तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं. ही आग लेव्हल 3 प्रकारची गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळेच आग नियंत्रणासाठी घटनास्थळावर 10 अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्या आहेत. अद्याप या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, परिसरात भीतीचं वातावरण आहे.

या आगीने आजूबाजूच्या झोपडपट्ट्यांनाही आपल्या भक्षस्थानी घेण्याची भीती आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होईल. त्यामुळेच आगीवर नियंत्रणासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहे. मानखुर्दमध्ये झोपडपट्टीत लागलेल्या या भीषण आगीत असंख्य झोपड्या जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तसेच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून युद्ध पातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीची भीषणता इतकी मोठी होती की धुरांचे लोट आकाशात पसरले होते. सुदैवाने यात अद्याप कुठलीही जीवितहानी झाल्याची प्राथमिक माहिती नाही.

दरम्यान या घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळताच 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन जवान युद्ध पातळीवर आग विझविण्याचा प्रयत्न करत आहेत. ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र या झोपडपट्टीत असलेल्या एका स्क्रॅप गोदामाला आग लागल्यामुळे या झोपडपट्टयांना आग लागली आहे. या आगीत आतापर्यंत किती नुकसान झाले आहे याची अधिकृत माहिती मिळालेली नाही. आग नियंत्रणात आल्यानंतरच हे स्पष्ट होऊ शकणार आहे.

संबंधित बातम्या :

विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात आग, पाच कामगार गंभीर

जोगेश्वरी परिसरातील गोदामाला भीषण आग

प्रसिद्ध मुर्तीकार खातू यांच्या कारखान्याला भीषण आग

Massive Fire in Mankhurd Slum Mumbai

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *