रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा धीम्या मार्गावर, हार्बरवर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर आणि पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव अप आणि डाऊन दोन्ही जलद मार्गांवर हा ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे …

Mumbai Railway Mega Block, रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा धीम्या मार्गावर, हार्बरवर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर आणि पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव अप आणि डाऊन दोन्ही जलद मार्गांवर हा ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे आज प्रवाशांचे हाल होणार आहेत. मध्य रेल्वेवर सकाळी 11.10 ते दुपारी 3.40, हार्बरवर सकाळी 11.10 ते दुपारी 3.40 आणि पश्चिम रेल्वेवर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 या वेळेत हा ब्लॉक घेतला जाणार आहे

मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर चालवण्यात येतील. त्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन स्थानकांवर थांबतील. माटुंगानंतर त्या पुन्हा धीम्या मार्गावर चालवण्यात येतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल दोन्ही मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येतील.

सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर धावणार आहेत. या मार्गावर लोकल 10 ते 15 मिनिटे उशिराने धावतील.

आज रेल्वेच्या तीन्ही मार्गावर ब्लॉक घेण्यात येत आसल्याने प्रवाशांना याचा त्रास सहन कराव लागू शकतो.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *