रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वे रुळाच्या आणि ओव्हरहेड वायरच्या कामासाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज (रविवारी) विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांचे रविवारी हाल होणार आहेत. मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे मध्य रेल्वे मार्गावर लोकलशिवाय एक्स्प्रेस गाड्यांचाही खोळंबा झाला आहे. अंबरनाथ-बदलापूर दरम्यान हुसेननगर …

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वे रुळाच्या आणि ओव्हरहेड वायरच्या कामासाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज (रविवारी) विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांचे रविवारी हाल होणार आहेत. मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे मध्य रेल्वे मार्गावर लोकलशिवाय एक्स्प्रेस गाड्यांचाही खोळंबा झाला आहे. अंबरनाथ-बदलापूर दरम्यान हुसेननगर एक्स्प्रेस गाडीचं इंजिन बंद पडल्यामुळे तेथील सर्व एक्स्प्रेस गाड्यांचा खोळंबा झाला आहे. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी किमान पाऊण तास लागत आहे.

रविवारी घेण्यात येणाऱ्या या मेगाब्लॉकमध्ये मध्ये रेल्वेवर ठाणे ते कल्याण दरम्यान, पश्चिम रेल्वेवर अंधेरी ते बोरिवली दरम्यान आणि हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्याम हा ब्लॉक घेण्यात आला आहे. ठाणे ते कल्याण दरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. यादरम्यान सर्व लोकल या धीम्या मार्गावरुन धावतील. तर मुख्य मार्गावरील फेऱ्या या 10 मिनिटं उशिराने धावण्याची शक्यता वर्तवली आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर अंधेरी ते बोरिवली दरम्यान आज सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या मार्गावरील सर्व जलद आणि धीम्या लोकल या अप-डाऊन मार्गावर धीम्या गतीने सुरु राहणार आहेत. तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. येथे सकाळी 11.10 ते दुपरी 3.40 वाजेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक दरम्यान कुर्ला ते वाशी दरम्यान एकही लोकल धावली जाणार नाही. सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल मार्गावर विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

व्हिडीओ : ENBA पुरस्कार सोहळ्यात TV9 मराठीची बाजी

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *