यंदाही म्हाडाची आमदार-खासदारांसाठी राखीव घरं!

मुंबई: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडाने 1382 घरांच्या लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.16 डिसेंबरला लॉटरीची सोडत जाहीर होणार आहे. त्यासाठी 5 नोव्हेंबरपासून 10 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे यंदा अल्प उत्पन्न गटातील घरांची संख्या सर्वाधिक आहेत. अल्प उत्पन्न गटात तब्बल 926 घरं आहेत, तर अत्यल्प उत्पन्न गटात सर्वात कमी 63 घरं …

यंदाही म्हाडाची आमदार-खासदारांसाठी राखीव घरं!

मुंबई: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडाने 1382 घरांच्या लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.16 डिसेंबरला लॉटरीची सोडत जाहीर होणार आहे. त्यासाठी 5 नोव्हेंबरपासून 10 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे यंदा अल्प उत्पन्न गटातील घरांची संख्या सर्वाधिक आहेत. अल्प उत्पन्न गटात तब्बल 926 घरं आहेत, तर अत्यल्प उत्पन्न गटात सर्वात कमी 63 घरं आहेत.

महत्त्वाचं म्हणजे यंदाही म्हाडाने आमदारांसाठी विविध उत्पन्न गटात तब्बल 26 घरं राखीव ठेवली आहेत. बरं उच्च उत्पन्न गटात राखीव घरं असती तर एकवेळ समजू शकता आलं असतं, पण अल्प गटातही आमदारांसाठी घरं राखीव आहेत.

अल्प उत्पन्न गटासाठी 25 हजार ते 50 हजार अशी उत्पन्न मर्यादा आहे. पण तरीही या गटात आमदारांना राखीव घरं ठेवण्यात आली आहेत.

आमदारांचे पगार दोन वर्षापूर्वीच वाढून जवळपास दीडलाख रुपये झाले आहेत. शिवाय आमदारांना विविध भत्ते, रेल्वे, एसटीप्रवास मोफत, रुग्णालयात सूट असते. आमदारांसाठी मुंबईत आमदार निवास आणि मंत्र्यांना बंगले आहेत. आमदारांच्या अनेक सोसायटी आहेत, मात्र तरीही त्यांना म्हाडाने घरं आरक्षित केली आहेत.

कोणत्या उत्पन्न गटात आमदारांना राखीव घरं?

अल्प उत्पन्न गट – 18

अँटॉप हिल वडाळा – 6 घरं

प्रतिक्षा नगर सायन – 2 घरं

पीएमजीपी मानखुर्द – 5 घरं

गव्हाणपाडा मुलुंड – 5 घरं

मध्यम उत्पन्न गट –

महावीर नगर, कांदिवली (प) – 3 घरं

सिद्धार्थ नगर, गोरेगाव –  1 घर

उच्च उत्पन्न गट –

तुंगा पवई (299 A) – 1 घर

तुंगा पवई (300 A) – 2 घरं

लोअर परळ मुंबई – 1 घर

आमदारांचे पगार (ऑगस्ट 2016 नुसार)

आमदार :1 लाख 60 हजार ते 1 लाख 70 हजार

राज्यमंत्री :1 लाख 79 हजार ते 1 लाख 99 हजार

कॅबिनेट मंत्री : 1 लाख 80 हजार ते 2 लाख

निवृत्त आमदारांना किमान 50 हजार निवृत्ती वेतन

दोन टर्म आमदार राहिलेल्या आमदारांना 60 हजार वेतन

शिवाय सातवा वेतन आयोगही लागू करण्यात येणार आहे

म्हाडाच्या घरांसाठी कुटुंबाची मासिक उत्पन्न मर्यादा:

अत्यल्प उत्पन्न गट – 25,000

अल्प उत्पन्न गट – 25001 ते 50,000 रुपये

मध्यम उत्पन्न गट – 50,001 ते 75,000 रुपये

उच्च उत्पन्न गट – 75,001 पेक्षा जास्त

म्हाडा वेबसाईटवर अर्ज भरा

 म्हाडाच्या  lottery.MHADA.gov.in.    या वेबसाईटवर लॉग इन करुन तुम्हाला म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करता येणार आहेत.

कोणत्या उत्पन्न गटात किती घरं?

अत्यल्प उप्पन्न गट – 63 घरं

अल्प उत्पन्न गट – 926 घरं

मध्यम उपन्न गट – 201 घरं

उच्च उपन्न गट – 194  घरं

5 कोटी 80 लाखाचं सर्वात महाग घर ग्रांट रोडला

सर्वात कमी किंमतीचं घर 14.61 लाखात चांदविली

5 नोव्हेंबरपासून लॉटरीच्या नोंदणीला सुरुवात

अर्ज करण्यासाठी 10 डिसेंबर अंतिम मुदत.

16 डिसेंबरला लॉटरीची सोडत निघणार

संबंधित बातम्या

मुंबई ‘म्हाडा’ची जाहिरात प्रसिद्ध, हक्काचं घर घेण्यासाठी अर्ज कसा भराल?  

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *