राज ठाकरे यांची मुलाखत : ‘अल्बममध्ये नाचणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी बोलू नये, उत्तरं द्यावी’

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत एकही उमेदवार उभा न करता, तरीही चर्चेत असलेला चेहरा म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे. पहिल्या टप्प्यात राज ठाकरे यांनी राज्यभरात 6 सभा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर टीकास्त्र सोडलं. राज ठाकरे यांच्या पुढील सभा मुंबईत होणार आहेत. त्याआधी राज ठाकरे यांनी मराठी वृत्तवाहिन्यांमधील पहिली मुलाखत टीव्ही […]

राज ठाकरे यांची मुलाखत : 'अल्बममध्ये नाचणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी बोलू नये, उत्तरं द्यावी'
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत एकही उमेदवार उभा न करता, तरीही चर्चेत असलेला चेहरा म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे. पहिल्या टप्प्यात राज ठाकरे यांनी राज्यभरात 6 सभा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर टीकास्त्र सोडलं. राज ठाकरे यांच्या पुढील सभा मुंबईत होणार आहेत. त्याआधी राज ठाकरे यांनी मराठी वृत्तवाहिन्यांमधील पहिली मुलाखत टीव्ही 9 मराठीला दिली.

राज ठाकरे यांनी सध्या सुरु असलेल्या सभा, नरेंद्र मोदी-अमित शाह, शरद पवार, मुख्यमंत्री आणि सध्याची राजकीय परिस्थिती याबाबत भाष्य केलं.

तुमची स्क्रीप्ट बारामतीवरुन येते?

राज ठाकरे यांना तुमची स्क्रीप्ट बारामतीवरुन येते का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे म्हणाले,” फालतू आहे. यांच्याकडे उत्तरं नाहीत. माझी स्क्रीप्ट यांना आता दिसली. माझ्या प्रश्नांना उत्तरं द्या”.

लाव रे तो व्हिडीओ

सध्या हा डायलॉग सर्वत्र गाजतोय. त्याबाबत राज म्हणाले, “मी एक-दोनदा ते म्हणालो. मी काही सतत ते बोलत नाही. हा विचार (व्हिडीओ लावण्याचा) काही काल परवाचा नाही. या सर्व क्लीप सोशल मीडियावर आहेत. मी असं प्रेझेंटेशन नगरपालिकांमध्येही दिलं. त्यावेळी मीडियाने ते दाखवलं नाही. या क्लीप केवळ दाखवत नाही तर त्या एक्सप्लेन करतोय. ही माणसं आधी काय बोलत होती, आता काय बोलतायेत? जी स्वप्नं मोदींनी दाखवली आणि आता काय करतायेत?”

व्हिडीओ प्रेझेंटेशनमुळे यापुढे कोणतेही राजकारणी खोटे बोलणं टाळतील, असं राज ठाकरे म्हणाले.

परतीचा पाऊस

दोनवर्षापूर्वी मी व्यंगचित्र केलं होतं, ते होतं परतीचा पाऊस..  या चित्रात  नरेंद्र मोदी-अमित शाह डोक्याला हात लावून बसले होते. ज्या सोशल मीडियामुळे ते सत्तेत आले, तोच त्यांच्यावर उलटला, असं राज ठाकरे म्हणाले.

मी ज्या गोष्टी दाखवतो, त्याची उत्तरं भाजपकडे नाहीत. हरिसाल, मोदींचं दत्तक गाव, याबाबत उत्तरं नाहीत. आधीचं सरकार नालायक ठरलं म्हणून तुम्हाला सत्तेत आणलं पण तुम्ही त्यापेक्षा नालायक ठरला, असा घणाघात राज यांनी केला.

महाराष्ट्रात 1 लाख 20 हजार विहिरी बांधल्या म्हणतात, मग दुष्काळ का? मोदी म्हणतात साडेआठ लाख संडास बांधले…त्यांना वाटलं लोक हे विसरतील. पण हे कसं विसरणार? असा सवाल राज यांनी केला.

राज ठाकरेंवर विश्वास का ठेवायचा?

2014 मध्ये मोदींना निवडून द्या म्हणत होता, आता म्हणता निवडून देऊ नका, तुमच्यावर विश्वास का ठेवायचा? असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला.

त्यावर राज ठाकरे म्हणाले, ” तेव्हा विश्वास का ठेवला? माणूस बदलला म्हणून माझी भूमिका बदलली. खोट्या आश्वासनांमुळे देशावर संकट ओढवलं. 2 कोटी रोजगार देणार म्हणाले, जाहिरातबाजीवर कोट्यवधी खर्च केला, मुलांना रोजगार मिळाले नाही. नोटाबंदी, जीएसटीमुळे रोजगार गेले. यासाठी तुम्हाला निवडून दिले का?”

एखाद्या माणसावर विश्वास ठेवला आणि जर त्याने भ्रमनिरास केला तर तुमची पहिलीच भूमिका कायम ठेवायची का, अशी विचारणा यावेळी राज ठाकरे यांनी केली.

दोन व्यक्ती विरुद्ध देश

सध्याची निवडणूक ही पक्षांची नाही दोन व्यक्ती विरुद्ध देश अशी निवडणूक आहे. ज्याप्रकारचं वातावरण या दोघांनी (मोदी-शाह) तयार केलंय ते अत्यंत चुकीचं आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश म्हणतात मला महत्त्वाच्या सुनावण्या घ्यायच्या आहेत, पण सरकारच्या मर्जीप्रमाणे वागत नसल्याने माझ्यावर खोटे आरोप करत आहेत. सुप्रीम कोर्टाचे जज पत्रकार परिषद घेऊन लोकशाही धोक्यात आहे हे पहिल्यांदाच सांगतात. आरबीआयचे 2 गव्हर्नर राजीनामे देतात, हे पहिल्यादाच घडलं, खोटं बोलून या दोघांनी देशाला फसवलं, त्याबद्दल भाजपवाले का बोलत नाहीत? असं राज म्हणाले.

देशावर संकट

लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार न देता मोदी-शाहांविरोधात मी प्रचार करत आहे त्याचं कारण म्हणजे हे दोघे देशाचं वाटोळं करत आहेत. आणीबाणीच्या काळात पु ल देशपांडे, दुर्गाबाई भागवत यांनी प्रचार केला, त्यांचेही उमेदवार नव्हते. एखादी गोष्ट चुकीची असेल तर ते सांगण्यासाठी उमेदवारांची गरज नाही, असं राज म्हणाले.

बेगानी शादी में….

मुख्यमंत्री म्हणतात बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज म्हणाले…

कुठल्या ना कुठल्या अल्बममध्ये नाचणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी असं बोलू नये. प्रश्न असा आहे की मी जे विचारतोय त्याची उत्तरं द्या. जवान से जादा साहस रखने की ताकद व्यापारी रखता है या वाक्याचा अर्थ सांगा. पुलवामा शहीद, एअर स्ट्राईक जवानांच्या नावे मतं मागता, त्या जवानांप्रती तुमचं मत काय? जवानांपेक्षा व्यापारी साहसी? याची उत्तरं आहेत का? हरिसालमधील वाटोळं केलं त्याचं उत्तर काय? मूळ मुद्दा सोडून बोलतात.

माझी जाहीर भूमिका

माझ्या सभांचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला झाला तर होऊ दे, हे मी आधीच सांगितलं आहे. त्यामुळे मी काही लपून छपून करत नाही, असं राज ठाकरेंनी नमूद केलं.

तुमच्या  सभांचा खर्च त्या त्या पक्षाच्या अकाऊंटमध्ये टाकायचा का?

याबाबत राज ठाकरे म्हणाले, मी निवडणूकच लढवत नाही. त्यांना (भाजप) माणसं आणावी लागतात, त्यामुळे त्यांचा खर्च होतो. आम्हाला माणसं आणावी लागत नाही, त्यामुळे खर्च नाही, असं राज यांनी नमूद केलं.

राज ठाकरे लाईव्ह

प्रश्न – तुमची स्क्रीप्ट बारामतीवरुन येते?

राज ठाकरे : फालतू आहे. यांच्याकडे उत्तरं नाहीत. माझी स्क्रीप्ट यांना दिसली. माझ्या प्रश्नांना उत्तरं द्या

प्रश्न – तुम्ही राष्ट्रीय नेते होऊ पाहात आहे का? तुमची भाषणं भाषांतर करुन अपलोड केली जातात.

राज ठाकरे : मला इथेच राहू द्या. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून    माझी भाषणं विविध राज्यात पोहोचत आहेत. लोक विचार करत आहेत. त्यासाठी मला रामलिला मैदानात जाऊन भाषण करण्याची गरज नाही

  • शरद पवार सत्तेत होते तेव्हा त्यांच्याविरोधात बोललो. आता भाजपवाले सत्तेत आहेत, त्यांच्याविरोधात बोलतोय. माझी भाषा बदलली नाही  – राज ठाकरे
  • आणीबाणीत सर्व साहित्यिक बोलत होते, आता कुठे गेले साहित्यिक? पत्रकार कुठे गेले? – राज ठाकरे
  • मी जे करतोय, ते खरंतर या देशातील मीडियाने केलं पाहिजे – राज ठाकरे
  • मागील निवडणुकीत मी भाजपच्या बाजूने आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात बोललो, त्यावेळी मला भाजपने पैसे दिले होते का?
  • गेल्या साडेतीन-चार वर्षांपासून मी मोदी-शाह यांच्याविरोधात बोलतोय, व्हिजअली पहिल्यांदा दिसल्याने ते घाबरलेत – राज ठाकरे
  • मी आर्टिस्ट आहे, स्टेजवर काय कुठे पाहिजे, हे मला कळतं, म्हणून माझ्या सभा व्यवस्थित होतात – राज ठाकरे
  • गुप्तहेर खात्याने सुचना देऊनही काळजी घेतली गेली नाही, मग यावर प्रश्न विचारायचा नाही का? : राज ठाकरे
  • जवानांच्या गाडीवर हल्ला होत असेल, तर यांना प्रश्न नाही का विचारायचे? – राज ठाकरे
  • आणीबाणीवेळी पुलं, दुर्गा भागवत यांनीही प्रचार केला, त्यांचे काय उमेदवार उभे होते का? प्रत्येकवेळा उमेदवारच पाहिजे का? – राज ठाकरे

प्रश्न – सभांचं नीटनेटकं नियोजन कसं होतं?

राज ठाकरे : मी एक आर्टिस्ट आहे. सभास्थळ, मंच कसा असावा, काय दिसायला हवं, पोडियम कसं असावं, हे सगळं मी ठरवून दिलेलं आहे

प्रश्न – तुमच्या  सभांचा खर्च त्या त्या पक्षाच्या अकाऊंटमध्ये टाकायचा का?

राज ठाकरे : मी निवडणूकच लढवत नाही. त्यांना (भाजप) माणसं आणावी लागतात, त्यामुळे त्यांचा खर्च होतो. आम्हाला माणसं आणावी लागत नाही, त्यामुळे खर्च नाही

प्रश्न –  2014 मध्ये मोदींना निवडून द्या म्हणत होता, आता म्हणता निवडून देऊ नका, तुमच्यावर विश्वास का ठेवायचा?

राज ठाकरे : तेव्हा विश्वास का ठेवला? माणूस बदलला म्हणून माझी भूमिका बदलली. खोट्या आश्वासनांमुळे देशावर संकट ओढवलं

प्रश्न –  मुख्यमंत्री म्हणतात बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना

राज ठाकरे : अल्बममध्ये नाचणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य करु नये. माझ्या प्रश्नांच्या उत्तरावर बोलावं

  • माणूस (नरेंद्र मोदी) बदलला, म्हणून माझी भूमिका बदलली – राज ठाकरे
  • काँग्रेसवाले नालायक ठरले म्हणून तुम्हाला (भाजप) आणलं, तर तुम्ही त्यांच्याहून नालायक निघालात – राज ठाकरे
  • भाजपने सुरुवातीला सोशल मीडिया वापरला, तोच आता त्यांच्यावर उलटतोय – राज ठाक
  • मी फक्त व्हिडीओ क्लिप दाखवत नाही, त्या व्हिडीओचं विश्लेषण करुन सांगतो की, हे लोक त्यावेळी काय बोलत होते आणि आज काय बोलत आहेत
Non Stop LIVE Update
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.