'मातोश्री'च्या दारावर मनसेची पोस्टरबाजी

मुंबई : भाजप आणि शिवसेनेची आगामी लोकसभा निवडणुकीसाठी युती झाल्यानंतर सर्वच स्तरातून शिवसेनेवर टीका सुरु झाली. सत्तेत राहून मित्रपक्ष असलेल्या भाजपला विरोध करणाऱ्या शिवसेनेने निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या मांडीला मांडी लावून बसणं पसंत केलं. त्यानंतर शिवसेनेची खिल्ली उडवण्यात आली. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही शिवसेनेविरोधात मुंबईत पोस्टरबाजी सुरु केली आहे. विशेष म्हणजे, मनसेने दुसरे-तिसरे कुठे नव्हे, तर …

'मातोश्री'च्या दारावर मनसेची पोस्टरबाजी

मुंबई : भाजप आणि शिवसेनेची आगामी लोकसभा निवडणुकीसाठी युती झाल्यानंतर सर्वच स्तरातून शिवसेनेवर टीका सुरु झाली. सत्तेत राहून मित्रपक्ष असलेल्या भाजपला विरोध करणाऱ्या शिवसेनेने निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या मांडीला मांडी लावून बसणं पसंत केलं. त्यानंतर शिवसेनेची खिल्ली उडवण्यात आली. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही शिवसेनेविरोधात मुंबईत पोस्टरबाजी सुरु केली आहे. विशेष म्हणजे, मनसेने दुसरे-तिसरे कुठे नव्हे, तर थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजेच ‘मातोश्री’च्या दारावर पोस्टरबाजी केली आहे.

‘वाघाची सिंहाला मिठी सत्ताकारणासाठी’ असे वाक्य आणि त्यावर वाघ आणि सिंहाचे चित्र असलेले पोस्टर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील ‘मातोश्री’ या निवासस्थानी लावण्यात आले आहे. हे पोस्टर ‘मातोश्री’समोरुन येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

दोनच दिवसांपूर्वी ‘शिवसेना-भाजप युती हिंदुत्त्वासाठी, देशप्रेमासाठी’ अशा आशयाचे पोस्टर शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी लावले होते. त्यानंतर या पोस्टर्सना उत्तर म्हणून मनसेने ‘वाघाची सिंहाला मिठी सत्ताकारणासाठी’ अशा आशयाचे पोस्टर्स लावले आहेत. मनसे आणि शिवसेनेच्या या पोस्टरयुद्धाची सध्या मुंबईसह राज्याच्या राजकारणात चर्चा आहे.

अखेर शिवसेना भाजपच्या सोबत!

शिवसेना आणि भाजप यांच्या युतीची 18 फेब्रुवारी रोजी घोषणा झाली. भाजपाध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख यांच्या उपस्थितीत मुंबईत ही घोषणा झाली. युतीचा फॉर्म्युला आणि शिवसेनेच्या अटी याबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच माहिती दिली. महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. यापैकी शिवसेना 23 आणि भाजप 25 जागांवर लढणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *