Aarey tree cutting : 'आरे'तील वृक्षतोड अद्याप सुरु, दोन दिवसात 1800 झाडांची कत्तल

आरे कॉलनीत मेट्रो कारशेडसाठी आतापर्यंत 2600 झाडांपैकी 1800 झाडांची अवघ्या दोन दिवसात (Aarey tree cutting) कत्तल करण्यात आली आहे. यामुळे पर्यावरणी प्रेमींना धक्का बसला.

Aarey tree cutting : 'आरे'तील वृक्षतोड अद्याप सुरु, दोन दिवसात 1800 झाडांची कत्तल

मुंबई : आरे कॉलनीत मेट्रो कारशेडसाठी आतापर्यंत 2600 झाडांपैकी 1800 झाडांची अवघ्या दोन दिवसात (Aarey tree cutting) कत्तल करण्यात आली आहे. यामुळे पर्यावरणी प्रेमींना धक्का बसला. यादरम्यान जवळपास 29 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आल्या (Aarey tree cutting) आहेत. तसेच 100 पेक्षा अधिक लोकांना यादरम्यान ताब्यात घेण्यात आलं होतं. विशेष म्हणजे झाडे तोडत असताना तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असून कोणलाही आत जाण्यास परवानगी (Aarey tree cutting) देण्यात येत नाही.

आरे कॉलनी शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांना पोलिसांनी 5 तास ताब्यात घेतले होते. तसेच 29 जणांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आरे कॉलनीच्या प्रवेशद्वाराजवळ अद्यापही पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. प्रत्येक नागरिकाचे ओळखपत्रांची तपासणी करुन करुन पोलिस (Aarey tree cutting) आत सोडत आहेत अशीही माहिती स्थानिकांनी दिली आहे.

आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड प्रकरणी दाखल केलेल्या सर्व याचिका शुक्रवारी (4 ऑक्टोबर) मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या. आरे मेट्रो कारशेडप्रकरणी शुक्रवारी हायकोर्टाने निकाल दिल्यानंतर रात्रीच्या अंधारात झाडं कापण्यास सुरुवात झाली. झाडं कापण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक पर्यावरण प्रेमी आणि आरे वाचवा याची माहिती मिळताच अनेकांनी कारशेडमध्ये घुसण्याचे प्रयत्न केले. मात्र पोलिसांनी याला विरोध केला. यामुळे अनेक संतप्त पर्यावरण प्रेमींनी झाडांना मिठी झाड तोडण्यास विरोध दर्शवला.

शुक्रवारी रात्रीपासून अनेक पर्यावरण प्रेमी दोन दिवसांपासून आरे कॉलनी परिसरात ठाण मांडून बसले आहे. आरे वाचवा’ असे नारेही पर्यावरणप्रेमींतर्फे दिले जात आहेत. तसेच काहींनी आरे परिसरात रास्ता रोको केला. त्यामुळे आरे परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे आरे परिसरात संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

वृक्ष प्राधिकरणाने महानगरपालिकेच्या वेबसाईटवर शुक्रवारी (4 ऑक्टोबर) हायकोर्टाच्या आदेशाची प्रत अपलोड करण्यात आली. ही झाड कापण्यास 15 दिवसांचा कालावधी मिळणं अपेक्षित होतं. मात्र त्यापूर्वीच एमएमआरसीएल झाडांची कत्तल करायला सुरुवात केली.

पर्यावरणप्रेमी झोरु भथेना (Zoru Bhathena) व ‘वनशक्ती’ (Vanshakti) स्वयंसेवी संस्थेने कारशेडबाबत दाखल केलेल्या सर्व याचिका हायकोर्टाने फेटाळल्या (Bombay HC dismisses all Aarey pleas) आहेत. त्यामुळे मेट्रो कारशेड आरे कॉलनीमध्येच होण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या : 

Aarey tree cutting : आरे कॉलनीत शेकडो झाडांवर कुऱ्हाड, पोलिसांकडून पर्यावरणप्रेमींची धरपकड

आरेतील वृक्षतोड करणाऱ्यांना Pok मध्ये पाठवा : आदित्य ठाकरे

‘आरे’प्रकरणी सर्व याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळल्या

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *