धारावीत 200 बेड्सचे कोरोना रुग्णालय, अवघ्या 15 दिवसात उभारणी

धारावी येथील महाराष्ट्र नेचर पार्कजवळ ऑक्सिजन सुविधायुक्त (Dharavi Covid Special Hospital) 200 खाटांचे कोरोना रुग्णालय उभारण्यात आले आहे.

धारावीत 200 बेड्सचे कोरोना रुग्णालय, अवघ्या 15 दिवसात उभारणी

मुंबई : मुंबईतील घनदाट लोकवस्तीचा भाग असलेल्या धारावी येथील महाराष्ट्र नेचर पार्कजवळ ऑक्सिजन सुविधायुक्त (Dharavi Covid Special Hospital) 200 खाटांचे कोरोना रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालयाला नुकतंच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भेट दिली. अवघ्या 15 दिवसांच्या कालावधीत उभारलेल्या या रुग्णालयात त्याच परिसरातील रुग्णांना उपचार घेता येणार आहे. आजपासून हे रुग्णालय सुरु होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे बऱ्याचदा श्वास रोखण्याच्या (Dharavi Covid Special Hospital) तक्रारींना सामोरे जावे लागते. अशावेळी या रुग्णांना वेळीच ऑक्सिजनचा पुरवठा झाला तर त्यांचे प्राण वाचू शकतात. तसेच स्थानिकांना त्या भागातच उपचाराची सोय व्हावी यासाठी मुंबई महापालिकेमार्फत धारावीतील बस डेपो जवळ हे कोरोना आरोग्य सेंटर सुरू करण्यात आले आहे. केवळ 15 दिवसांमध्ये 200 खाटांच्या रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. यातील प्रत्येक बेडला ऑक्सिजनची सोय आहे. त्यामुळे ज्या कोरोनाबाधित रुग्णाला श्वास घेण्याचा त्रास जाणवत असले त्याला तात्काळ या सेंटरमध्ये ऑक्सिजन देऊन उपचार केले जातील.

या रुग्णालयासाठी 10 डॉक्टर्स, 15 नर्स आणि वॉर्डबॉय तसेच पूर्णवेळ रुग्णवाहिका देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. या रुग्णालात सीसीटिव्ही यंत्रणा देखील बसविण्यात आली आहे. त्याच बरोबर थर्मल सेंसर यंत्रणा देखील असून त्याद्वारे तापाच्या रुग्णांची वेळीच तपासणी होणे शक्य होईल. कोरोनाशिवाय अन्य संशयित रुग्णांवर याठिकाणी मोफत उपचार करण्यात येतील.

आरोग्यमंत्र्यांनी या रुग्णालयाला भेट देऊन त्याची पाहणी केली. अल्पावधीत रुग्णालय उभे राहीले याबद्दल त्यांनी यंत्रणेनेचे कौतुकही (Dharavi Covid Special Hospital) केले.

संबंधित बातम्या : 

Maharashtra Corona Update | राज्यात 2,361 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 70 हजारांच्या पार

मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 40 हजारच्या उंबरठ्यावर, कोणत्या वॉर्डात किती रुग्ण?

गिरगावातील प्रसिद्ध डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू, फॅमिली डॉक्टरच्या निधनाने बॉलिवूडचं कपूर कुटुंब शोकात

रेल्वे स्टेशन ते घर, मुंबईत केवळ पाच स्थानकांवर टॅक्सी सेवेला मंजुरी

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *