मुकेश अंबानींचे चिरंजीव मोदींच्या बीकेसीतील सभेला हजर

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांनी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा दिला असला तरी त्यांचे चिरंजीव मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी जातीने उपस्थित आहेत. मोदींची मुंबईतील बीकेसीमध्ये सभा होत आहे. या सभेच्या ठिकाणी मुकेश अंबानींचे चिरंजीव अनंत अंबानी दिसून आले. त्यांच्या मित्रांसोबत ते उपस्थित आहेत. मुकेश अंबानी यांनी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांना …

मुकेश अंबानींचे चिरंजीव मोदींच्या बीकेसीतील सभेला हजर

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांनी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा दिला असला तरी त्यांचे चिरंजीव मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी जातीने उपस्थित आहेत. मोदींची मुंबईतील बीकेसीमध्ये सभा होत आहे. या सभेच्या ठिकाणी मुकेश अंबानींचे चिरंजीव अनंत अंबानी दिसून आले. त्यांच्या मित्रांसोबत ते उपस्थित आहेत.

मुकेश अंबानी यांनी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा जाहीर केला होता. मिलिंद देवरा हे काँग्रेसचे दक्षिण मुंबईचे उमेदवार आहेत.

सकाळी वाराणसीमध्ये शक्तीप्रदर्शन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी मध्य प्रदेशात दोन सभा घेतल्या. त्यानंतर मुंबईतही सभा होत आहे. मुंबईत लोकसभेच्या सहा जागा आहेत. या सर्व जागांसाठी 29 एप्रिलला मतदान होतंय. त्यासाठी शिवसेना आणि भाजपने जंगी सभांचं आयोजन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह बड्या नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतलाय.

महाराष्ट्रात सभांचा धडाका सुरु आहे. शिर्डी मतदारसंघासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची संगमनेरमध्ये सभा होत आहे, तर नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे सभा घेत आहेत. मनसेचा एकही उमेदवार निवडणुकीत नसताना राज ठाकरेंकडून मोदींवर हल्लाबोल सुरु आहे. मोदींच्या भाषणाचे व्हिडीओ दाखवून ते भाजपविरोधात प्रचार करत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *