मुंबईतील व्यक्तीला दुबईत तब्बल 18 कोटींची लॉटरी, रातोरात कोट्याधीश

मुंबई : आतापर्यंत अनेकजण लॉटरीमुळे करोडपती, तर कुणी लखपती बनले आहेत. नशीबवान लोकांना लॉटरी लागते, असं म्हटलं जातं. अशाच एका मुंबईच्या नशीबवान व्यक्तीला तब्बल कोट्यावधी रुपयांची लॉटरी लागली आहे. रविंद्र भुल्लर असं या व्यक्तीचं नाव आहे. संयुक्त अरबमधील अमीरातमध्ये भुल्लर यांनी लॉटरीचं तिकीट खरेदी केलं होतं. भारतीय वंशाच्या रविंद्र भुल्लर यांना 27 लाख डॉलर (अंदाजे …

, मुंबईतील व्यक्तीला दुबईत तब्बल 18 कोटींची लॉटरी, रातोरात कोट्याधीश

मुंबई : आतापर्यंत अनेकजण लॉटरीमुळे करोडपती, तर कुणी लखपती बनले आहेत. नशीबवान लोकांना लॉटरी लागते, असं म्हटलं जातं. अशाच एका मुंबईच्या नशीबवान व्यक्तीला तब्बल कोट्यावधी रुपयांची लॉटरी लागली आहे. रविंद्र भुल्लर असं या व्यक्तीचं नाव आहे. संयुक्त अरबमधील अमीरातमध्ये भुल्लर यांनी लॉटरीचं तिकीट खरेदी केलं होतं.

भारतीय वंशाच्या रविंद्र भुल्लर यांना 27 लाख डॉलर (अंदाजे 18.65 कोटी रुपये) ची लॉटरी लागली आहे. खलीज टाईम्सने या वृत्ताची माहिती दिली. बुधवारी हा ड्रॉ अबू धाबी येथील आंतरराष्ट्रीय हवाई अड्ड्यावर आयोजित करण्यात आला होता. मात्र त्यावेळी भुल्लर हे मुंबईत होते. त्यामुळे त्यांना लॉटरी लागली असल्याची माहिती उशिरा समजली. आयोजकांनी भुल्लर यांच्या मुलीला संपर्क साधला आणि लॉटरी लागल्याची माहिती दिली. यानंतर एका आठवड्याने भुल्लर यांना लॉटरी लागल्याचे समजले.

अबू धाबीमधील बिग तिकीट लॉटरी चौथ्यांदा एका भारतीय व्यक्तीला लागली आहे. याआधीही फेब्रुवारी महिन्यात प्रशांत पंडरथील या भारतीय वंशाच्या व्यक्तीला लॉटरी लागली होती. त्यांना 19.45 कोटी रुपयांची लॉटरी लागली होती. पंडरथी यांनी अबूधाबीमध्ये बिग तिकीटमध्ये ऑनलाईन तिकीट खरेदी केलं होतं. बिग तिकीट अबू धाबीमध्ये नगद पुरस्कार आणि लक्झरी कारसाठी सर्वात मोठी आणि सर्वात जुनी प्रसिद्ध लॉटरी स्पर्धा आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *