कसाबला फासापर्यंत नेणाऱ्या साक्षीदाराची झुंज संपली, हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांचे निधन

देवेंद्र फडणवीस यांनी हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांच्या उपचारासाठी भाजपकडून दहा लाखाच्या मदतीची घोषणा केली होती.  (Mumbai Attack 26/11 Hero Harishchandra Srivardhankar, who witnessed against Ajmal Kasab, Dies)

कसाबला फासापर्यंत नेणाऱ्या साक्षीदाराची झुंज संपली, हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांचे निधन

कल्याण : मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यात जिवंत सापडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाब याची ओळख पटवणारे साक्षीदार हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांचे निधन झाले. प्रदीर्घ आजारानंतर राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कामा रुग्णालयाबाहेर दहशतवाद्यांच्या दोन गोळ्या झेलणारे हरिश्चंद्र श्रीवर्धनकर मे महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत फूटपाथवर आढळले होते. (Mumbai Attack 26/11 Hero Harishchandra Srivardhankar, who witnessed against Ajmal Kasab, Dies)

काही दिवसांपूर्वी श्रीवर्धनकर यांना कल्याणच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कल्याण डोंबिवलीचे भाजप नगरसेवक दया गायकवाड यांनी हरिश्चंद्र यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस कल्याणमधील आयुष हॉस्पिटलमध्ये भेटीला गेले होते. फडणवीस यांनी त्यांच्या उपचारासाठी भाजपकडून दहा लाखाच्या मदतीची घोषणा केली होती.

कोण होते हरिश्चंद्र श्रीवर्धनकर?

हरिश्चंद्र श्रीवर्धनकर हे कसाबला ओळखणारे पहिले साक्षीदार होते. कसाबला फाशीपर्यंत पोहोचवणाऱ्या मुख्य साक्षीदारांपैकी ते एक होते. हरिश्चंद्र यांनी विशेष न्यायालयासमोर कसाबला ओळखले होते आणि त्याच्याविरुद्ध साक्ष दिली होती.

त्यांच्या पाठीत कसाब आणि त्याचा साथीदार अबू इस्माईलने घातलेल्या दोन गोळ्या लागल्या होत्या. त्यांनी आपल्या ऑफिसच्या बॅगने इस्माईलला मारलेही होते.

हरिश्चंद्र अत्यंत कठीण परिस्थितीत दिवस ढकलत होते. निराधार अवस्थेत ते फूटपाथवर आढळले होते. त्यावेळी बरेच दिवस त्यांनी काही खाल्लेही नव्हते.

मुंबईतील चिंचपोकळी येथील सातरस्ता येथील डिसुझा नामक दुकानदाराने श्रीवर्धनकरांना मदत केली होती आणि पोलिसांच्या मदतीने कुटुंबाशी भेट घडवली होती. (Mumbai Attack 26/11 Hero Harishchandra Srivardhankar, who witnessed against Ajmal Kasab, Dies)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *