थकीत 120 कोटी तातडीने भरा, जिल्हाधिकाऱ्यांची MCA ला नोटीस

मुंबई क्रिकेट अससोसिएशनला थकीत कर भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने नोटीस पाठवली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत विधानसभेत लेखी उत्तरात माहिती दिली.

थकीत 120 कोटी तातडीने भरा, जिल्हाधिकाऱ्यांची MCA ला नोटीस

मुंबई : मुंबई क्रिकेट अससोसिएशनला थकीत कर भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने नोटीस पाठवली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत विधानसभेत लेखी उत्तरात माहिती दिली. मुंबईतील वानखेडे स्टेडियमसाठी मुंबई क्रिकेट अससोसिएशनने शासनासोबत 50 वर्षाचा करार केला होता. हा करार गेल्यावर्षी संपला.

मुंबई क्रिकेट अससोसिएशनला 120 कोटी 16 लाख 17 हजार रुपये भरणा करण्याची नोटीस पाठवली आहे. मुंबई क्रिकेट अससोसिएशन 50 वर्षांसाठी भाडे तत्वाने देण्यात आलेला करार हा 05/02/2018 मध्ये संपुष्टात आला आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी लेखी उत्तरात दिली. आता एमसीएकडून राज्य सरकारला हे पैसे कधी मिळणार हे पाहावं लागेल.

आशिष शेलार एमसीएचे अध्यक्ष

दरम्यान, एमसीएचे विद्यमान अध्यक्षपद हे भाजप नेते आणि नुकतेच मंत्रिमंडळात सहभागी झालेले शिक्षण मंत्री आशिष शेलार सांभाळत आहेत. त्यामुळे आशिष शेलार हे एमसीएचे अध्यक्ष म्हणून राज्य सरकारला काय उत्तर देणार हे पाहावं लागेल.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *