हॉटस्पॉट बनलेल्या मुंबईत कोरोना आटोक्यात, रुग्णांच्या आकड्यात कमालीची घट

मुंबईत कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. (Mumbai Corona Positive Patient Decrease)

हॉटस्पॉट बनलेल्या मुंबईत कोरोना आटोक्यात, रुग्णांच्या आकड्यात कमालीची घट

मुंबई : राज्यात कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या मुंबईत कोरोना आटोक्यात येत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. मुंबईत गणेशोत्सवापासून कोरोनाचा आकडा हा 2000 पार गेला होता. मात्र मुंबईत काल (26 ऑक्टोबर) 804 कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. (Mumbai Corona Positive Patient Decrease)

मुंबईत गणेशोत्सवापासून त्यानंतर दिवसेंदिवस कोरोनाचा रुग्णांमध्ये वाढ होत होती. मुंबईत दर दिवशी जवळपास 2000 हून अधिक कोरोना रुग्ण आढळत होते. मात्र सद्यस्थितीत या आकड्यात घट झाली आहे. काल मुंबईत 804 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली.

तसेच मुंबईत रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता 132 दिवसांवर गेला आहे. मुंबईतील 24 विभागांपैकी 23 विभागात हा कालावधी 100 दिवसांवर गेला आहे.

मुंबईतील फक्त आर दक्षिण या विभागात रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी शंभरपेक्षा कमी आहे. या विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 97 दिवस इतका आहे. तर एफ दक्षिण विभागाची लक्षणीय कामगिरी सुरूच आहे.

या विभागात रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून आता तब्बल 256 दिवसांवर पोहोचला आहे. या विभागात रूग्ण वाढीचा सरासरी दरही 0. 27 टक्के इतका आहे. विशेष म्हणजे मुंबईतील हा सर्वात कमी दर आहे. (Mumbai Corona Positive Patient Decrease)

संबंधित बातम्या : 

सांगलीतील 425 एसटी कर्मचारी बेस्ट बससेवेसाठी मुंबईत, 106 जणांना कोरोनाची बाधा

कोरोनाच्या काळात बंद उद्यानांवर मुंबई महापालिकेची 22 कोटींची उधळपट्टी

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *