कोरोनाग्रस्ताशी डॉक्टरचे अश्लील चाळे, मुंबईतील पुरुष रुग्णाचा आरोप

34 वर्षांच्या पुरुष डॉक्टरने आपल्याशी लैंगिक चाळे केल्याचा आरोप 44 वर्षांच्या कोरोनाग्रस्त पुरुषाने केला आहे. (Mumbai doctor booked for sexual assault of Corona Patient)

कोरोनाग्रस्ताशी डॉक्टरचे अश्लील चाळे, मुंबईतील पुरुष रुग्णाचा आरोप
Follow us
| Updated on: May 04, 2020 | 1:05 PM

मुंबई : एकीकडे ‘कोविड योद्धे’ डॉक्टर स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार घेत आहेत. मात्र अशात मुंबईत ‘रुग्णसेवे’ला गालबोट लावणारी घटना समोर आली आहे. प्रसिद्ध रुग्णालयातील डॉक्टर तरुणाने उपचारादरम्यान आपल्याशी अश्लील चाळे केल्याचा आरोप कोरोनाग्रस्त पुरुष रुग्णाने केला आहे. नोकरीच्या पहिल्याच दिवशी दुष्कृत्य करणारा डॉक्टर निलंबित झाला आहे. (Mumbai doctor booked for sexual assault of Corona Patient)

34 वर्षांच्या पुरुष डॉक्टरने आपल्याशी लैंगिक चाळे केल्याचा आरोप 44 वर्षांच्या कोरोनाग्रस्त पुरुषाने केला आहे. आरोपी डॉक्टरविरोधात आग्रीपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, मात्र आरोपी कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्याला अटक करण्याऐवजी राहत्या घरातच क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्याच्याविरोधात आयपीसी कलम 377, 269 आणि 270 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’ वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

एक मे रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ‘आरोपी डॉक्टर दहाव्या मजल्यावर असलेल्या आयसीयूमधील रुग्णाच्या रुममध्ये गेला. त्यानंतर आरोपीने रुग्णासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मात्र रुग्णाने विरोध करत जवळील अलार्म वाजवला. तेव्हा रुमबाहेर असलेले कर्मचारी तातडीने आतमध्ये आले’ असा आरोप तक्रारीत केला आहे.

विशेष म्हणजे आरोपी डॉक्टरचा तो कामावरील पहिलाच दिवस होता. 30 एप्रिललाच हा डॉक्टर रुग्णालयात रुजू झाला होता. डॉक्टरला तातडीने निलंबित केल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. डॉक्टरला ठाण्यातील त्याच्या राहत्या घरातच क्वारंटाइन करण्यात आल्याचं आग्रीपाडा पोलिसांनी सांगितलं. (Mumbai doctor booked for sexual assault of Corona Patient)

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.